एक्स्प्लोर

मॉरिशसच्या कर्करुग्णांवर आता नागपुरात उपचार; देवेंद्र फडणवीसांसमक्ष झाला सामंजस्य करार

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर 8 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहोळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू हे नागपूर येथील अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते

मुंबई : नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट, नागपूर आणि मॉरिशस सरकार यांच्यात आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली असून, मॉरिशसमधील कॅन्सर उपचारात आता नागपूरचा फार मोठा सहभाग राहणार आहे. मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. या करारानुसार, मॉरिशसमधील कर्करोग रुग्णांना नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट आंतरराष्ट्रीय दर्जाची वैद्यकीय सेवा मिळू शकेल. त्याचप्रमाणे मॉरिशसमधील रुग्णालयांमध्ये कार्यरत आरोग्य कर्मचारी, नर्सेस इत्यादींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुद्धा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटवर राहील. या सामंजस्य कराराच्या वेळी मॉरिशसचे कौन्सिल जनरल अरविंद बख्तावार, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे सीईओ शैलेश जोगळेकर आणि वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक उपस्थित होते.

मॉरिशस येथील महाराष्ट्र भवनासाठी राज्य सरकारतर्फे जाहीर 8 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्याच्या सोहोळ्यासाठी मॉरिशसचे केंद्रीय मंत्री अ‍ॅलन गानू हे नागपूर येथील अधिवेशनादरम्यान, नागपूर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी नॅशनल कॅन्सर (Cancer) इन्स्टिट्युटला भेट दिली आणि तेथील अत्याधुनिक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पाहून ते भारावून गेले होते. त्याचवेळी असा सामंजस्य करार करण्याचे सूचोवाच त्यांनी केले होते आणि त्यातूनच आजचा दिवस साकारला. या सामंजस्य करारानंतर बोलताना मॉरिशसचे मंत्री अ‍ॅलन गानू म्हणाले की, या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसचे संबंध आणखी सुदृढ होतील. आमच्या देशात 18 वर्षांपर्यंतच्या कर्करोग रुग्णांना मोफत उपचारांची सुविधा दिली जाते. अलिकडेच ती वयोमर्यादा वाढवून 25 करण्यात आली आहे. या करारामुळे मॉरिशसमधील रुग्णांना सुद्धा आता चांगल्या आरोग्यसुविधा प्राप्त होणार आहेत. हा करार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत होतो आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राने कायमच स्वत: समृद्ध होताना जगाला मदतीचा हात देऊ केला आहे. अ‍ॅलन गानू हे तर आमचे अतिशय जवळचे मित्र आहेत. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा लोकार्पणासाठी मॉरिशसला गेलो होते. आपली मराठी परंपरा तेथे इतक्या चांगल्याप्रकारे जपली जाते, याचा मला विशेष आनंद झाला. या करारामुळे महाराष्ट्र आणि मॉरिशसच्या संबंधात नागपूरचा आणखी एक नवा आयाम जोडला जाणार आहे, याचा मला विशेष आनंद आहे.

हेही वाचा

अर्ध्या तासाच्या पावसाने नाशिक जलमय, पुण्यातही जोरदार हजेरी; यवतमाळमध्ये दुचाकी गेली वाहून

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget