एक्स्प्लोर

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा बेकायदेशीर जीआर रद्द करा : आमदार कपिल पाटील

आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहलं आहे. जीआर मागे घेतला नाही तर शिक्षक भारतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मुंबई : राज्यातील सर्व खाजगी अनुदानित/अंशत: अनुदानित माध्यमिक/उच्च माध्यमिक शाळांतील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी आकृतीबंध निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार शिक्षण विभागाने 11 डिसेंबर 2020 ला ठोक मानधनावर चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना नेमण्याचा निर्णय घेतला आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा हा बेकायदेशीर जीआर रद्द करा यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मागणी केली आहे.

या निर्णयामुळे राज्यातील 52 हजारपदांवर गंडातर आले आहे. आता शाळेचे शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाज करण्यासोबतच शाळेची घंटा कोण वाजविणार, असा प्रश्‍न शाळांसमोर निर्माण झाला आहे. तर हा निर्णय महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली 1981 मधील तरतुदींशी विसंगत आहे. उपरोक्त कायदा किंवा किमान वेतन कायद्यात अद्यापी विधिमंडळाने बदल केले नसल्याने अशाप्रकारे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी नेमणे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा हा बेकायदेशीर जीआर रद्द करा यासाठी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारतीने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र लिहून मागणी केली आहे, अशी माहिती शिक्षक भारतीचे कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी दिली आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचारी (शिपाई, नाईक, पहारेकरी, रात्रीचा पहारेकरी, सफाईगार, कामठी, तेलवाला, चौकीदार, प्रयोगशाळा परिचर इत्यादी) हे गरीब, बहुजन, मागासवर्गीय आणि अल्पसंख्य वर्गातून येतात. त्यांचा रोजगार हिरावून घेण्यात आला आहे. फुले, शाहू, आंबेडकर, प्रबोधनकार यांच्या नावाने राज्य करणारं सरकार इतका मोठा अन्याय कसा करू शकतं? असा सवाल आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात विचारला आहे. 11 डिसेंबर 2020 चा बेकायदेशीर व शिक्षणाचे कंत्राटीकरण करणारा अन्यायकारकशासन निर्णय रद्द न केल्यास शिक्षक भारती राज्यव्यापी आंदोलन करणार आहे, असा इशारा पत्रात देण्यात आला आहे.

शिपायाला फक्त पाच हजार रुपये मानधन नवीन आदेशानुसार ग्रामीण भागात शिपायाला पाच हजार रुपये मानधन देण्यात यावे, असे सांगितले आहे. महिलांना शेतामध्ये कामाला पाचशे रुपये रोज मिळतो. वाढती महागाई लक्षात घेता या मानधनावर शिपाई मिळेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संबंधित बातम्या : अनुदानित शाळांवर आता शिपाई नेमता येणार नाही?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Baba Khan: मोठी बातमी : सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बाबा खान यांच्या घराबाहेर गोळीबार, आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांवरही फायरिंग; मुंब्रामध्ये खळबळ
Babanrao Taywade : मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Maharashtra Live blog updates: मुंबईत ज्येष्ठ नागरिकांसाठी महापालिकेचे पहिले वृद्धाश्रम; गोरेगाव पूर्व येथे लवकरच लोकार्पण
Pune Crime News : तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना
तू खूप सुंदर दिसतेस म्हणत हात पकडला अन्....; डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग; पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील संतापजनक घटना

व्हिडीओ

Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report
Shetkari KarjMafi : कर्जमाफी मिळणार, कधी, कशी आणि किती? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ameria Israel Iran War live Update: अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध आठव्या दिवशीही सुरूच; 5 हजारांवर बॉम्ब फेकले, 1200 हून अधिक ठार; युद्धखोर मानवी क्रौर्याची परिसीमा गाठणारे 15 फोटो
Ameria Israel Iran War live Update: युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
युद्धाचे आठ दिवस होऊन चिवट इराण शरण येईना; इकडं आज रात्री अमेरिकेची आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हल्ल्याची थेट धमकी, तिकडं इराणी मिसाईलींचा नवा लाॅट इस्त्रायलच्या दिशेनं डागला
Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल
शाब्बास…तुम्ही परंपरा जपली! काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
Gas Cylinder Price Hiked : युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
युद्धाचा भडका, सर्वसामान्यांना महागाईचा चटका! घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती महागल्या; आजपासून नवे दर लागू
Ind vs Nz Final Pitch Report : भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबाबत मोठी अपडेट
Arjun Tendulkar : लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लग्न झालं, अक्षता डोक्यावर पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी अर्जुन तेंडुलकर मैदानात, चाहत्यांच्या अपेक्षाभंग; वैभव सूर्यवंशीही ठरला फेल
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
लेकाने सीफेसिंग फ्लॅट विकला, 15 दिवसातंच बिग बींची आयोध्येत मोठी गुंतवणूक; रामजन्मभूमीत किती कोटींची डील?
Vishwas Patil : ‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
‘संभाजी’ कादंबरीतील अंत्यसंस्काराचा उल्लेख काल्पनिक, कोरेगाव भीमा आयोगासमोर विश्वास पाटील यांची कबुली
Embed widget