एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बांधकाम व्यावसायिकाच्या मुलावर गुंडाकडून गोळीबार
निलेशने चपळाई दाखवत आपली लँड क्रुझर गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात घातली. यामुळे त्याचा जीव वाचला, अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी टिपू पठाणच्या एका साथीदाराला अटक केली आहे.
पुणे : हांडेवाडी रोड येथे राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक शेखर बिनावत यांच्या मुलावर कुख्यात गुन्हेगाराने हांडेवाडी रोड ते हडपसर असा दुचाकीवरून थरारक पाठलाग करून चार गोळ्या झाडल्या. लँड क्रुझर गाडीतून जाणाऱ्या या मुलाचे दैव बलवत्तर त्याने थेट हडपसर पोलीस ठाण्यात गाडी घातल्यामुळे त्याचा जीव वाचला. निलेश शेखर बिनावत ( 25 रा. केशवानंद बंगला, हांडेवाडी रोड ) असे या मुलाचं नाव आहे. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
काल रात्री निलेश बिनावत हा मोहंमदवाडी भागातील सैय्यदनगर मधून त्याच्या लँड क्रुझर गाडीतून जात असताना त्या भागातील टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांशी त्याची नजरानजर झाली. माझ्याकडं का बघतो? म्हणून वाद सुरू झाला आणि निलेश बिनावतला मारहाण करण्यात आली.
त्यानंतर निलेश बिनावत त्याच्या साथीदारांना घेऊन टीपू पठाण आणि त्याच्या साथीदारांना मारण्यासाठी पुन्हा सय्यद नगरमधे आला. त्यावेळी झालेल्या भांडणातून टिपू पठाणने गोळीबार करण्यास सुरुवात केली. तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या निलेश बिनावतचा पाठलाग करुन गोळ्या झाडल्या.
हांडेवाडी रोडवरील तरवडे वस्ती येथे हा प्रकार घडला. निलेशवर चार गोळ्या झाडण्यात आल्या. सुदैवाने गोळ्या बाजूने गेल्याने निलेश जखमी झाला. निलेशने चपळाई दाखवत आपली लँड क्रुझर गाडी थेट हडपसर पोलीस ठाण्यात घातली. यामुळे त्याचा जीव वाचला, अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी या प्रकरणी टिपू पठाणच्या एका साथीदाराला अटक केली आहे. मात्र मुख्य संशयित आरोपी टिपू पठाण फरार आहे. टिपू पठाण हा सराईत गुंड असून त्याच्या टोळक्याची महंमदवाडी रोड परिसरात दहशत आहे. या प्रकारामुळे पुण्यातील कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
Advertisement