बुलढाण्यात दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक, दोन जणांचा मृत्यू तर चार जण जखमी
बुलढाणा (Bulldhana) जिल्ह्यात मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. शेगाव - सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे.
Bulldhana Accident : बुलढाणा (Bulldhana) जिल्ह्यात मोठा अपघात (Accident) झाल्याची घटना घडली आहे. शेगाव - सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमीमधील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर शेगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींमधील तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी जाणाऱ्या लातूरच्या वाहनाचा अपघात
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी हजारो मराठा बांधवांसह मुंबईत येत आहेत. त्यांनी आवाहन केल्या प्रमाणे हजारो मराठा बांधव वाहनाने मुंबईत येत आहेत. आज लातूर जिल्ह्यातील काही मराठा बांधव पीकअप वाहनाने मुंबईत येत असताना फ्री वे वर अपघात झाला यात तिघेजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आलं आहे. दुपारपासून मुंबईत पावसाची रिमझिम सुरू असल्याने रस्ते निसरडे झाले आहेत, त्यात चालकाचे नियंत्रण सुटले आणि पीकअप उलटली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Jharkhand Accident News: कावडियांच्या बसची ट्रकला जोरदार धडक, 18 भाविकांचा मृत्यू, झारखंडमध्ये भीषण अपघात
























