Buldhana : पाण्यासाठी गेला जीव, ट्रकच्या धडकेत आयटीआयच्या विद्यार्थ्याचा मूत्यू
Buldhana Update : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा (Student) ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. शैलेश राठोड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
Buldhana News Update : बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा (Student) ट्रकच्या धडकेत मृत्यू झाला आहे. तर एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. शैलेश राठोड असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे तर नवनाथ जुमडे असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. शैलेश आणि नवनाथ हे पाणी आणण्यासाठी गेल्यानंतर ट्रकने दोघांना उडवले. यात शैलेशचा मृत्यू झाला.
मेहकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पिण्याच्या पाण्याचे संयंत्र गेल्या अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे. विद्यार्थ्यांकडून याबाबत प्राचार्यांकडे अनेकवेळा तक्रार देखील करण्यात आली होती. परंतु, अनेकवेळा तक्रारी करूनही संयंत्र दुरूस्त करण्यात आले नाही. संयंत्र बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपल्याकडील पैसे जमवून शुद्ध पिण्याचे पाणी विकत आणायची वेळ आली आहे. आज शैलेश राठोड आणि नवनाथ जुमडे हे दोघे पिण्याचे पाणी आणण्यासाठी संस्थेबाहेर गेले होते. यावेळी भरधाव ट्रकने दोघांना जोराची धडक दिली. यात शैलेश जागीच ठार झाला तर नवनाथ गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी दोघांनाही रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी शैलेश याला मृत घोषित केले. जखमी नवनाथ याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
"पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने पाणी आणण्यासाठी गेल्यामुळे शैलेश याला आपल्या जीव गमवावा लागला आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असती तर आज शैलेशचा अपघात झाला नसता." अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत. शिवाय शैलेश याच्या मृत्यूला संस्थेचे प्राचार्य जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
दरम्यान, या अपघातानंतर बुढाणा जिल्ह्यातील वातावरण तापलं असून प्राचार्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकांमधून आणि नागरिकांमधून करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Akola: आईचे क्रूर कृत्य, पोटच्या मुलीला मध्य प्रदेशात 80 हजारांना विकले
- धुळे पोलिसांनी जप्त केलेल्या तलवारी आरोपी कोठे घेऊन जाणार होते? सुरक्षा यंत्रणांसमोर प्रश्न
- Dhule News : पेट्रोलिंग दरम्यान पाठलाग करुन भरधाव कारला रोखलं, चार जणांकडून 90 तलवारी जप्त