Buldhana Nanabhau Kokare Residential Ashram School case: आश्रम शाळेत लैंगिक शोषण, नराधमाला पाच वर्षांची शिक्षा; आशा मिरगेंची पोस्ट, 'माझा'च्या पाठपुराव्याचं कौतुक
स्त्री प्रथम माणूस आहे, तिला माणसाप्रमाणे वागवले पाहिजे. हीच खरी नवरात्राची शिकवण आहे. प्रारंभी भीतीपोटी मौन बाळगलेल्या मुलींनी समुपदेशनानंतर धाडसाने सत्य मांडल्याचे आशा मिरगे म्हणाल्या

Buldhana Nanabhau Kokare Residential Ashram School case: बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील नानाभाऊ कोकरे निवासी आदिवासी आश्रम शाळेत (Nanabhau Kokare Residential Ashram School) 2016 मध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपी इत्तू सिंग काळू सिंग पवारला न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. या निकालाबाबत राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य डॉ. आशा मिरगे (Dr. Asha Mirge reaction) यांनी समाधान व्यक्त करत न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणखी दृढ झाल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या की, आज न्याय मिळाल्याचा मला आनंद आहे. समुपदेशनामुळे मुलींनी मौन सोडले आणि आरोपीस शिक्षा झाली. हा अनुभव स्पष्ट सांगतो ते म्हणजे मौन सोडू, बोलूया! पीडितेला सांगावे की अत्याचार तिची चूक नाही, तर अन्याय आहे. समाज म्हणून आपण हमी दिली पाहिजे की अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होणारच, असे डॉ. आशा मिरगे म्हणाल्या. स्त्री प्रथम माणूस आहे, तिला माणसाप्रमाणे वागवले पाहिजे. हीच खरी नवरात्राची शिकवण आहे. प्रारंभी भीतीपोटी मौन बाळगलेल्या मुलींनी समुपदेशनानंतर धाडसाने सत्य मांडले. यातून 11 मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले होते.
एबीपी माझाच्या टीमचे कौतुक
आशा मिरगे यांनी सांगितले की, या तपासात तत्कालिन पोलिस महानिरीक्षक मोहन राठोड (आयजी), आरती सिंग (महिला पोलीस अधीक्षक), डीवायएसपी सोळंके, खामगाव पोलिस निरीक्षक व त्यांची टीम तसेच पत्रकारांनी सक्रिय भूमिका बजावली. विशेषतः पत्रकार सरिता कौशिक (तेव्हा ABP माझा, सध्या संपादक), कॅमेरामन अतुल व पत्रकार उमेश अलोने यांनी दोन दिवस घटनास्थळी राहून योग्य वार्तांकन केले. निष्ठावंत, ध्येयवादी, महिला पत्रकार संपादक पदी रूढ झाल्याचा मला अत्यंत आनंद असल्याचे उद्गार त्यांनी काढले.
धडा एकच, मौन सोडू, बोलूया!
डॉ. आशा मिरगे यांनी सांगितले की,न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे. कारण 2016 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील पाळा येथील नानाभाऊ कोकरे निवासी आश्रम शाळेत घडलेल्या लैंगिक शोषण प्रकरणात आरोपीस पाच वर्षांची शिक्षा ठोठावली गेली आहे. त्या घटनेची आठवण आजही मनाला अस्वस्थ करते. रात्री उशिरा तत्कालीन डीवायएसपी श्री. सोळंके यांचा फोन आल्यावर मी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली. तेथे अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी पाच तास प्रतीक्षेत होती. तातडीने लेडी डॉक्टर बोलावून तिची तपासणी करून vaginal swab घेतला. दुसऱ्या दिवशी खामगाव पोलिसांसोबत आश्रमशाळेला भेट दिली असता मुलींच्या डोळ्यांतील भीती जाणवली. आमिष दाखवून किंवा दबाव टाकून त्यांचे शोषण होत होते. हळूहळू मौन सोडत त्यांनी सत्य मांडले आणि अकरा मुलींवर अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाले. या संपूर्ण तपासात पोलीस अधिकारी, महिला पोलीस, पत्रकार तसेच सामाजिक यंत्रणांचे मोठे सहकार्य मिळाले. आज या प्रकरणात न्याय मिळाला असून मुली नॉर्मल आयुष्य जगत आहेत.
काय आहे घटनेची पार्श्वभूमी?
2016 मध्ये रात्री उशिरा तत्कालीन डीवायएसपी सोळंके यांनी संपर्क साधत अल्पवयीन मुलगी तपासणीसाठी अकोला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असल्याचे कळवले. पाच तास प्रतीक्षेनंतर डॉ. मिरगे यांनी स्वतः हस्तक्षेप करून तात्काळ लेडी गायकॉलॉजिस्टमार्फत तपासणी केली. vaginal swab तसेच odentologist तपासणीमुळे महत्वाचे पुरावे जतन झाले. पुढील तपासात उघड झाले की, आश्रम शाळेतील मुलींवर आमिष दाखवून वा दबाव टाकून वारंवार लैंगिक अत्याचार होत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
























