एक्स्प्लोर

Buldhana Loksabha : महायुतीतील माजी आणि विद्यमान आमदारांमध्ये रंगला कलगीतुरा; दोन्ही नेत्यांनी थेट एकमेकांचा बाप काढला!

Buldhana Lok Sabha Constituency: बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचातील वाद आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झालीय.

Lok Sabha Election 2024 : बुलढाण्याचे शिवसेना शिंदे गटाचे विद्यामन आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) आणि भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांचातील वाद आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकोपाला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यावरुन दोघांनीही एकमेकांवर जहरी टीका करत इशाराही दिला आहे. दरम्यान, यात महायुतीतील दोन्ही माजी आणि विद्यमान आमदारांनी एकमेकांचा बापही काढला आहे.

यावेळी बोलताना माजी आमदार शिंदे यांनी आमदार गायकवाड यांचा बाप काढलाय, तर निवडणूक झाल्यानंतर कोणाचे किती बाप आहेत हे दाखून देईल, असा थेट इशारा आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांना दिला आहे. यामुळे मात्र महायुतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली असून याचा फटका महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन्ही नेत्यांनी थेट एकमेकांचा बाप काढला

बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचा ए. बी. फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज आज बाद करण्यात आलाय. त्यामुळे आपसूकच आमदार संजय गायकवाड हे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडले आहेत. मात्र, या उमेदवारी अर्जावरुन दोन आजी-माजी आमदारांमध्ये खडाजंगी रंगल्याचे चित्र आहे. बुलढाणा लोकसभेतील भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी नुकतीच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत बावनकुळे यांनी, अर्ज मागे घ्या आणि युतीधर्माचे पालन करा’ असे कडक निर्देश दिले होते.

दरम्यान आपण कार्यकर्त्यांशी चर्चा करून आज सोमवारी निर्णय घेणार असल्याचे शिंदे यांनी त्यावेळी बोलताना सांगितले होते. दरम्यान आज आमदार संजय गायकवाड यांना ए. बी. फॉर्म न मिळाल्याने त्यांचा अर्ज आज बाद झाला आहे. परिणामी, भाजप लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी देखील आज आपली तलवार म्यान केलीय.

नेमकं काय म्हणाले माजी आणि विद्यमान आमदार?

ज्या उमेदवाराला आपला अर्ज ही भरता येत नाही त्याने दुसऱ्याला शिकवायची आणि सल्ला देण्याची गरज नाही. आमदार संजय गायकवाड यांनी आपला अर्ज कायम ठेवला असता, तर त्यांना देखील मी दाखवले असते, अशा शब्दात विजयाराज शिंदे यांनी आमदार संजय गायकवडांवर टीका केली होती. तर या टीकेला उत्तर देतांना आमदार संजय गायकवाड म्हणाले की, मला निवडणूक लढवायचीच नसल्याने माझा तो गेम प्लॅन होता आणि तो साध्य झालाय. माझ्या उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रश्न राहिला तर, मी गेली 28 वर्षांपासून निवडणुक लढतो आहे. विधानसभेच्या चार निवडणुका आजवर मी लढलोय. त्यामुळे मला अर्ज कसा भरतात हे शिकवण्याची गरज कुणाला नाही. एकदा निवडणुक होऊन जाऊ दे, मग दाखवतो, असा सज्जड दमही आमदार संजय गायकवाड यांनी दिलाय.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेतNew Delhi Republic Day Celebration : राजपथावर चित्तथरारक कसरती, चित्ररथांचा देखावा; प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Embed widget