एक्स्प्लोर

Buldhana Crime : धक्कादायक! नवं नियुक्त पोलीस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हल्ला; दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जखमी

Buldhana Crime : बुलढाणा शहराच्या गुन्हेगारी विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात पोलिसावर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतांना बुलढाणा शहरात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

Buldhana Crime बुलढाणा: बुलढाणा शहराच्या गुन्हेगारी (Crime) विश्वातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात नुकतेच एका पोलिसांवर कोयत्याने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे असतांना बुलढाणा शहरात देखील असाच काहीसा प्रकार समोर आला आहे. अवैध शस्त्र विक्रेत्याकडे छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात (Buldhana Crime) आला आहे. या हल्ल्यात दोन पोलीस अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी जखमी झाला असल्याची माहिती पुढे आली आहे. यात पोलिसांनी प्रतिकरासाठी गोळीबार देखील केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे नवं नियुक्त पोलीस अधीक्षकांवर पहिल्याच दिवशी हा हल्ला करण्यात आल्याने गुन्हेगारांना कायद्यासह पोलिसांचीही भीती उरलेली नाही का? असा सवाल या निमित्याने उपस्थित केला जात आहे.

पोलीस पथकावर तलवारीने हल्ला, प्रतिकरासाठी पोलिसांचा गोळीबार       

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरालगत असलेल्या म्हाडा कॉलनी परिसरात अवैध शास्त्राचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहर पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी मध्यरात्री म्हाडा कॉलनी परिसरातील मनोजसिंग टाक याच्या घराजवळ गेले, दरम्यान लपून बसलेल्या आरोपी मनोजसिंग टाक याने पोलीस पथकावर तलवारीने हल्ला केला. यात एक सह्यय्यक पोलीस निरीक्षक, एक पोलीस उपनिरीक्षक आणि एक कर्मचारी असे तिघे गंभीर जखमी झालेत. त्यावेळी सोबत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने बचावासाठी आपल्या एसएलआर रायफलीतून तीन राऊंड आरोपीच्या दिशेने फायर केले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन आरोपी मनोजसिंग टाक फरार झाला आहे. 

नवनियुक्त पोलीस अधीक्षकांवरच गुंडांचा हल्ला, अनेक शस्त्रेही जप्त 

सध्या जखमी पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांवर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल केले आहे. यात आर्म ॲक्टनुसार ही गुन्हा दखल केला आहे. आज सकाळी पोलिसांनी याच परिसरात छापा टाकून अनेक शस्त्रे जप्त केल्याची माहिती दिली आहे. मात्र, मध्यरात्री झालेल्या पोलीस पथकावरील हल्ला आणि गोळीबाराच्या घटनेने नवनियुक्त पोलीस अधीक्षकांना गुंडांनी एकप्रकारे सलामी दिल्याचे समोर आलं आहे. परिणामी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर असल्याचे बोलले जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget