Buldana Murder: जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलाची हत्या, बुलढाणा येथील धक्कादायक घटना
Buldana Murder: याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केलीय. तसेच चिमुकल्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आलाय.
Buldana Murder: बुलढाण्यात जन्मदात्या पित्यानंच पोटच्या 13 वर्षीय मुलाची हत्या केल्याची घटना उघडकीस आलीय. ही घटना सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथे आज (25 डिसेंबर) पहाटे घडलीय. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केलीय. तसेच चिमुकल्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आलाय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय.
अमर नन्हई असं हत्या झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. तर, सिध्देश्वर नन्हई (वय, 40) असं आरोपी पित्याचं नाव आहे. आरोपी हा अपंग असून त्याला दारूचे व्यसन होते. आरोपी दररोज दाऊ पिऊन घरी आल्यानंतर त्याची पत्नी रत्नमाला, मुलगी जान्हवी (वय, 5) आणि मुलगा अमर यांना त्रास द्यायचा. दरम्यान, आज सकाळी जान्हवी, अमर, रत्नमाला गाढ झोपेत असताना सकाळी चारच्या सुमारास आरोपीनं आईच्या कुशीत झोपलेल्या अमरला शौचास जायचं म्हणून सोबत घेऊन गेला. घराबाहेर पडल्यावर त्याचा गळा आवळून कोराडी नदीच्या पात्रात बुडवून निर्दयीपणे त्याची हत्या केलीय.
त्यानंतर आरोपीनं मुलाची हत्या केल्याची गावात जाहीरपणे सांगत आला. अमर घरात नसल्यानं आरोपीनं अमरची हत्या केल्याची हत्या स्पष्ट झालं. दरम्यान, गावकऱ्यांनी आरोपीला पोलीसांच्या हवाली करून मृतदेह नेमका कुठे टाकला? याची माहिती घेतली. तसेच अमरचा मृतदेह कोराडी नदीपात्रातील नाल्यातून मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तर तपासणीसाठी अकोला येथे पाठवण्यात आलाय. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पित्याला अटक केली असून पुढील चौकशीला सुरुवात केलीय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-