एक्स्प्लोर
बुलडाण्यात बाळाच्या जन्मानंतर 1 मिनिट 48 सेकंदात 'आधार'कार्ड
बुलडाण्यातील एका नवजात मुलीला जन्माच्या अवघ्या पावणे दोन मिनिटांनंतर आधार कार्ड मिळालं आहे.
बुलडाणा : बुलडाण्यातील एका नवजात मुलीला अवघ्या पावणे दोन मिनिटात आधार कार्ड मिळालं आहे. आधार नोंदणीचा हा अनोखा विक्रम खामगावातल्या अग्रवाल कुटुंबीयांनी आणि आधार नोंदणी अधिकाऱ्यांनी केला.
खामगावातील जलंब रोडवर एका खाजगी रुग्णालयात पहाटे शिल्पा अग्रवाल दाखल झाल्या होत्या. त्यांनी 18 एप्रिलला सकाळी आठ वाजता मुलीला जन्म दिला.
बाळाचे वडील आकाश अग्रवाल यांनी लगेचच लेकीची आधार कार्डसाठी नोंदणी केली. या नोंदणीनंतर अग्रवाल यांची कन्या साचीला पुढच्या 1 मिनिट 48 सेकंदात आधार कार्ड मिळालं.
याआधी उस्मानाबादमधील सहा मिनिटात आधार कार्ड काढण्याचा रेकॉर्ड भावना जाधव या चिमुरडीच्या नावावर होता. मात्र बुलडाणावासियांनी हा विक्रम मोडीत काढला. खामगाव शहराचं नाव या अनोख्या जलद आधार नोंदणी उच्चांकात नमूद झालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement