Sangli Crime : पोटच्या एकुलत्या एक नराधमाकडून जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून निर्घृण खून; जत तालुक्यातील माडग्याळमधील घटना
Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील माडग्याळ व व्हसपेठ हद्दीतील शेतातील घरात जन्मदात्या आईचा मुलानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

Sangli Crime : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील माडग्याळ व व्हसपेठ हद्दीतील शेतातील घरात जन्मदात्या आईचा मुलानेच दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडली. ही घटना जत व उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीजवळ घडल्याने दोन्ही पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित चौकशीअंती ही घटना जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने जत पोलीस ठाण्यात याबाबत नोंद झाली आहे.
जन्मदात्या आईचा दगडाने ठेचून खून केल्याचा भयंकर प्रकार घडला आहे. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. शांताबाई अण्णाप्पा कोरे (वय 55) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे, तर खून करणारा नराधम हा सुरेश आण्णाप्पा कोरे (वय 37) हा शांताबाई यांचा एकुलता एक मुलगा आहे. रविवारी दुपारी दुपारी धक्कादायक प्रकार घडला.
खून झालेल्या शांताबाई यांचा सुरेश हा एकुलता एक मुलगा आहे, पतीचे निधन झाले आहे. ते दोघेच शेतातील घरामध्ये राहत होते. रविवारी दुपारी शेतामध्ये आई व मुलगा यांच्यात वादावादी झाली. या वादातून आईच्या डोक्यात दगड घालून व दगडाने ठेचून खून केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
