एक्स्प्लोर

Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Breaking News LIVE Updates, 08 October 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...

Background

Petrol Price Today : महागाईचा 'भडका'; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाकल्या, एका लिटरसाठी किती रुपये?

Petrol Diesel Price on 08 October 2021 : पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) च्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाहीत. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किमतींमध्ये (Petrol price today) प्रति लिटर 30 पैसे आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Diesel price today) 35 पैशांची वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 1 लिटर पेट्रोलसाठी 103.54 रुपये आणि डिझेलसाठी 92.12 रुपये मोजावे लागणार आहेत. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणारं शहर मुंबईत पेट्रोलची किंमत 109.54 रुपये आणि डिझेलची किंमत 99.92 रुपये प्रति लीटर इतकी आहे. 

11 दिवसांमध्ये 2.35 रुपयांनी महागलं पेट्रोल

गेल्या मंगळवारपासून पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या आठवड्यात केवळ दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. याव्यतिरिक्त दरदिवशी यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 2.35 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल 3.50 रुपयांपर्यंत महागलं आहे.

देशात अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

Cruise Drugs Case: आर्यन खानला जामीन मिळणार? आज 8 आरोपींच्या याचिकेवर सुनावणी

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान आणि सात इतर आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आर्यन खानला कोठडी दिल्यानंतर आर्यन खानसह आठही जणांकडून जामिनासाठी अर्ज करण्यात आला. या आठही जणांच्या जामीन अर्जावर आज सकाळी 11 वाजता सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळणार की, कोठडीत वाढ होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 

क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आर्यन खानची एक दिवसाची कोठडी संपल्यानंतर सोमवारी पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी न्यायालयानं 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी सुनावणीत आली होती. ही कोठडी काल (7 ऑक्टोबर) संपली आहे. त्यामुळे आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धमेचासह सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. 

न्यायालयानं सांगितलं की, कोरोना रिपोर्टशिवाय आरोपींना कारागृहात नेता येत नाही. त्यामुळे सर्वांना गुरुवारी रात्री एनसीबीच्या कार्यालयातच राहावं लागणार आहे. न्यायालयाचा हा निर्णय आरोपींच्या वकिलांनी मान्य केला. न्यायालयात सुनावणी दरम्यान, एनसीबीनं आरोपींची एनसीबी कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. परंतु, न्यायालयानं याला परवानगी दिली नाही. 

21:08 PM (IST)  •  09 Oct 2021

पुण्यातील पूर्व भागात सायंकाळी 5 पासून मुसळधार पाऊस सुरू

पुण्यातील पूर्व भागात सायंकाळी 5 पासून मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पाणी घरांमध्ये शिरल्याच्या घटना घडल्या. पुण्यातील धानोरी भागात काही सोसायट्यांमध्ये आणि घरांमध्ये पाणी शिरले. धानोरी लोहगाव मुख्य रस्त्यावर पाण्याचा लोंढा आल्याने अनेक गाड्या बंद पडल्या. धानोरी लोहगाव मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.
शहरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, म. हौ. बोर्ड येथे पाणी साचल्या आहेत तर वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, येरवडा येथे 4 झाडपडीच्या घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली. अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे.

21:30 PM (IST)  •  08 Oct 2021

मुंबई विमानतळावर आज झालेल्या प्रवाश्यांच्या गर्दीनंतर विमानतळ प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना

मुंबई विमानतळावर आज झालेल्या प्रवाश्यांच्या गर्दी नंतर विमानतळ प्रशासनाकडून तातडीने पाऊले उचलली गेली आहेत. मुंबई विमानतळाची टर्मिनल 20 ऑक्टोबरऐवजी आता 13 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने सुरू केले जाणार आहे.

पुन्हा असा गोंधळ होऊ नये म्हणून मुंबई विमानतळावर इतरही उपाय योजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आज सकाळी, सणासुदीमुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी प्रवेश प्रक्रियेला विलंब झाला. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आणि विमानतळावर प्रवाशांची एकच गर्दी झाली होती.

हा विलंब गुप्तचर सतर्कतेमुळे वाढीव सुरक्षा उपायांमुळे तसेच चालू असलेल्या कोविड निर्बंधांमुळे वाढले होते. म्हणूनच, सुरक्षा प्रोटोकॉल अबाधित ठेवून सीएसएमआयएने विमानतळाचा अनुभव सुरळीत व्हावा यासाठी अनेक उपाय केले आहेत. 

 1) 20 ऑक्टोबर ऐवजी 13 ऑक्टोबरपासून टर्मिनल 1 चे कामकाज पुन्हा टप्याटप्याने सुरू केले जाणार आहे.

यामध्ये सुरुवातीला गो फर्स्ट फ्लाइट्सचे उड्डाणे होणार  त्यानंतर एअर एशिया 16 ऑक्टोबरपासून होणार आहे तर इतर फ्लाइट्ससुद्धा टर्मिनल 1 हुन सुरू होतील.

2) प्रवाशांच्या गर्दीवर त्वरित उपाय म्हणून सिक्युरिटी हँडलिंग एरिया (SHA) मध्ये प्रवाशांची आवक हाताळण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात केले जाणार आहेत

3) प्रवाशांच्या सामानाचे जलद स्कॅन करण्यासाठी पुढील चार दिवसात अतिरिक्त एक्स-रे मशीन बसवले जाणार आहेत

4) विमान कंपन्यांना प्रवाशांना लवकर अहवाल देण्याची आठवण करून देणे आणि सुरक्षा हाताळणीमध्ये विलंब टाळण्यासाठी त्यांच्या केबिनच्या सामानाची तपासणी करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

18:39 PM (IST)  •  08 Oct 2021

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरातीत पदांच्या संख्येत आता वाढ

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरातीत पदांच्या संख्येत आता वाढ. 290 ऐवजी 390 पदांकरीता भरती होणार. पूर्व परीक्षा दिनांक 2 जानेवारी, 2022 रोजी व मुख्य परीक्षा दिनांक 7, 8 व 9 मे, 2022 रोजी आयोजित करण्यात येईल. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत येणारे आता एकूण 390 पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवा पूर्व परीक्षा 2021 घेण्यात येणार आहे. दिनांक 5 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59 पर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज सादर करायचे आहेत. हे सर्व अर्ज परीक्षा शुल्कासह ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत.

17:59 PM (IST)  •  08 Oct 2021

ह्या कोर्टाला अधिकार नसल्यानं आमचं बेल अप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आलं आहे. आम्ही सेशन्स कोर्टात जाणार : ॲड. अली काशिफ, मुनमुन धमेचा याचे वकील

ह्या कोर्टाला अधिकार नसल्यानं आमचं बेल अप्लिकेशन रिजेक्ट करण्यात आलं आहे. आम्ही सेशन्स कोर्टात जाणार आहोत. सीसीटीव्हीबद्दलची मागणी देखील आम्ही केली आहे. यासंबधी उद्या काय आहे ते कळेल. आमचा मुद्दाच हा आहे की आमची तपासणी झाली होती त्यात तुम्हाला काहीच आढळलं नव्हतं. अशात ड्रग्ज मिळाल्याचा आरोप लावणे चुकीचं आहे. माझ्या क्लायन्टचा आणि आर्यन, अरबाजचा काही संबंध नाही. अशातच काही संबंधी देखील एनसीबी ॲस्टॅब्लिश करु शकली नाही. मुनमुन धमेचा याचे वकील ॲड. अली काशिफ यांचा युक्तीवाद.

17:55 PM (IST)  •  08 Oct 2021

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकिस

नागपूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकिस आलीय. एमआयडीसी पोलीस स्टेशन अंतर्गत सात जणांवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे.

17 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही इसासनी-मिहान मार्गावर मित्रासोबत फिरायला गेली, याच ठिकाणी 3 नराधमांनी तिच्या मित्राला मारहाण करत मुलीवर अत्याचार केला. यात पोलिसांच्या तपासात मुलीच्या मित्रानेच गेल्या तीन दिवसात काही तरुणांकडून पैसे घेऊन मुलीबरोबर शाररिक संबंध करण्याबाबत उद्युक्त केल्याची माहिती समोर आली.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jalgaon Train Accident | पुष्पक एक्सप्रेसला आग, उड्या मारल्या, बंगळुरू एक्सप्रेसने अनेकांना चिरडलंJalgaon Train Accidentआग लागल्याच्या भीतीने चालत्या गाडीतून उड्या मारल्या,बंगळुरु एक्प्रेसने चिरडलेGulabRao Patil on Jalgaon Train Accident|जळगावमध्ये मोठा रेल्वे अपघात, गुलाबराव पाटलांची प्रतिक्रियाJalgaon Train Accident | बंगळुरू एक्सप्रेसची प्रवाशांना धडक,  जळगावात रेल्वेची मोठी दुर्घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Train Accident : जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
जळगावमध्ये मोठी रेल्वे दुर्घटना, आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या, दुसऱ्या ट्रेनने सात ते आठ लोकांना चिरडले
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून दखल; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना कारवाईचे निर्देश
बांगलादेशी घुसखोरांविरोधात केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मोठा निर्णय; मुख्य सचिव, पोलीस महासंचालकांना लेखी निर्देश
Jalgaon train Accident आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
आग लागली, आग लागली असा आवाज अन्..; जळगावमधील रेल्वे अपघाताचा थरार; प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं काय घडलं
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेतील अन् योजना बंद करुन टाकतील : आदित्य ठाकरे
महापालिका निवडणुकीनंतर अपात्र लाडक्या बहिणींची यादी वाढेल, खात्यातून पैसे परत घेत योजना बंद होईल; आदित्य ठाकरेंचा घणाघात 
Eknath Shinde: एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
एकनाथ शिंदे 20 वर्षात 9 वेळा नाराज, पोहोचले दरेगावात; शिवसेनेत 2005 मध्ये पहिल्यांदा मनधरणी
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
बीडमधील सामाजिक ऐक्य व जातीय सलोखा अबाधित राहावा; धनंजय मुंडेंची गहिनीनाथ गडावर प्रार्थना
UPSC CSE Exam 2025 : यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
यूपीएससी परीक्षेची जाहिरात आली, IAS, IPS आणि IFS परीक्षेसाठी 'असा' अर्ज करा
Sharad Pawar: पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट;  शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
पुण्यात दूर्मीळ GBS रोगाचे संकट; शरद पवारांकडून राज्य सरकारला सूचना, दाहकता लक्षात घ्या
Embed widget