एक्स्प्लोर

Petrol Price Today : महागाईचा 'भडका'; आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या किमती कडाकल्या, एका लिटरसाठी किती रुपये?

Petrol Diesel Price on 08 October 2021 : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशातील सर्वच महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी उच्चांक गाठला आहे.

Petrol Diesel Price on 08 October 2021 : पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) च्या किमती कमी होण्याचं नाव घेत नाहीत. देशाच्या राजधानीसह सर्वच प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोलच्या किमतींमध्ये (Petrol price today) प्रति लिटर 30 पैसे आणि डिझेलच्या किमतींमध्ये (Diesel price today) 35 पैशांची वाढ केली आहे. या वाढीनंतर दिल्लीत 1 लिटर पेट्रोलसाठी 103.54 रुपये आणि डिझेलसाठी 92.12 रुपये मोजावे लागणार आहेत. तर देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळख असणारं शहर मुंबईत पेट्रोलची किंमत 109.54 रुपये आणि डिझेलची किंमत 99.92 रुपये प्रति लीटर इतकी आहे. 

11 दिवसांमध्ये 2.35 रुपयांनी महागलं पेट्रोल

गेल्या मंगळवारपासून पेट्रोलच्या किमतींमध्ये वाढ होण्यास सुरुवात झाली होती. या आठवड्यात केवळ दोन दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. याव्यतिरिक्त दरदिवशी यांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 11 दिवसांमध्ये पेट्रोलच्या किमतींमध्ये 2.35 रुपयांची वाढ झाली आहे. तर डिझेल 3.50 रुपयांपर्यंत महागलं आहे. 

देशांतील प्रमुख शहरांमध्ये एका लिटरसाठी किती पैसे मोजाल? (Petrol Diesel Price on 08 October 2021)

देशातील महत्त्वाची शहरं पेट्रोल रुपये/लिटर डिझेल रुपये/लिटर
दिल्ली   103.54 92.12
मुंबई  109.54 99.92
कोलकाता  104.23 95.23
चेन्नई  101.01 96.60

देशात अनेक शहरांत पेट्रोल-डिझेलनं ओलांडली शंभरी 

देशातील 26 राज्यांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर 100 रुपयांच्या पार पोहोचले आहेत. जम्मू-कश्मीर, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, नागालँड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, दिल्ली, नागालँड, पुडुचेरी, तेलंगाना, पंजाब, सिक्किम, उडीसा, केरल, तमिलनाडु, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचे दर 100 रुपये प्रति लिटरच्या पार आहेत. 

पेट्रोल-डिझेल GSTमध्ये घेण्यासाठी का तयार नाही केंद्र आणि राज्य सरकार?

केंद्र सरकारनं कर प्रणालीमध्ये सुधारणांची गरज असल्याचं कारण देत जीएसटी (GST) लागू केला होता. पण जीएसटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा समावेश करण्यात आलेला नाही. तसेच देशातील बहुतांश राज्य सरकारचंही हेच मत आहे की, पेट्रोल-डिझेलचा जीएसटीच्या कक्षेत समावेश केला जाऊ नये. पण का?  यामुळे काय फायदा होणार? यांसारखे अनेक प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत. जाणून घेऊया यामागील कारणं... 

पेट्रोल-डिझेलच्या किमती जीएसटीच्या कक्षेत आणण्याची केंद्र सरकारसोबत राज्य सरकारचीही इच्छा नाही. कारण सरकारला चिंता आहे ती, देशाच्या तिजोरीची. सामान्य माणसाला दिलासा देता-देतो, देशाच्याच तिजोरीत खडखडाट होण्याची भिती सरकारला वाटतेय. जर पेट्रोल-डिझेलचा समावेश जीएसटीच्या कक्षेत केला, तर पेट्रोल-डिझेलच्या किमती अर्ध्या होणार. आजच्या किमतीनुसार जर अंदाज लावला तर, पेट्रोल 56 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 55 रुपये प्रति लिटर विकलं जाईल. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवलीBaba Siddique : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांचा गोळीबारात मृत्यूUddhav Thackeray Full Speech : मोदींची मिमिक्री, RSSला सवाल; उद्धव ठाकरे यांचं दमदार भाषण ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray Dasara Melava : ... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
... तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात शिवाजी महाराजांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचं वचन
Embed widget