(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Breaking News LIVE Updates : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं जाणार घरचं जेवण
Breaking News LIVE Updates, November 02 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Neet Result 2021 : नीट परीक्षेचा निकाल जाहीर
सप्टेंबर रोजी एनटीए (नेशनल टेस्टिंग एजन्सी) द्वारे देशभरात मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. 16 लाख विद्यार्थी ज्यांनी ही परीक्षा दिली होती ते विद्यार्थी मागील काही दिवसांपासून परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार ? याची वाट बघत होते. सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी ला नीट परीक्षेचा निकाल जाहीर करण्याबाबत हिरवा कंदील दिल्यानंतर अखेर हा निकाल आज जाहीर झाला आहे.
अनिल देशमुख यांनी ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित
Anil Deshmukh At Ed Office : गेल्या बऱ्याच काळापासून नॉट रिचेबल असणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या रिचेबल झाले आहेत. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले असून ते आपला जबाब नोंदवणार असल्याची माहिती मिळत आहे. मनी लॉन्ड्रींग प्रकरणी अनिल देशमुख ईडीच्या रडारवर आहेत. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेली स्फोटकं आणि 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपांनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि आयपीएस अधिकारी परमबीर सिंह हे वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत. पण हे दोघेही तपास यंत्रणांच्या हाती मात्र लागत नव्हते. चार ते पाच वेळा समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख ईडीसमोर हजर न राहिल्यामुळं त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसेच अनिल देशमुखांचा शोध घेण्यासाठी ईडीनं सीबीआयकडे मदत मागितली होती. अशातच आज अनिल देशमुख स्वतः ईडीसमोर आपला जबाब नोंदवण्यासाठी हजर राहिले आहेत.
नवाब मलिक यांचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना प्रश्न
संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती समीर वानखेडे यांना क्लीनचिट कशी देऊ शकते? नवाब मलिक यांचा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदर यांना प्रश्न
राज्यात पार पडलेल्या पोलीस भरतीत तब्बल 2 हजार 897 जणांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोलीस भरतीत तब्बल २ हजार ८९७ जणांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय... पोलीस भरतीत एकाच वेळी एका पदासाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केले जातात त्यामुळे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांनी आता हा निर्णय घेतलाय... नुकतीच मुंबई, ठाणे, नागपूर, नवी मुंबई, अमरावती, औरंगाबाद यासह 14 जिल्ह्यात पोलीस शिपाई, चालक आणि राज्य राखीव पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया पार पडली. या भरती प्रक्रियेत नियमांना तिलांजली देत 2 हजार 897 उमेदारांनी एक पेक्षा अधिक ठिकाणी अर्ज भरल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे तत्काळ कारवाईचा बडगा पोलीस प्रशासनाकडून उगरण्यात आला आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं जाणार घरचं जेवण; घरून आलेला जेवणाचा डबा देण्याची विनंती कोर्टानं स्वीकारली
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना दिलं जाणार घरचं जेवण; घरून आलेला जेवणाचा डबा देण्याची विनंती कोर्टानं स्वीकारली.
Anil Deshmukh Arrested by ED : अनिल देशमुख ईडी कार्यालयातून न्यायालयाकडे रवाना
LIVE UPDATES : अनिल देशमुख ईडी कार्यालयातून न्यायालयाकडे रवाना, कोर्टात हजर करणार #AnilDeshmukh #AnilDeshmukhArrested #ED https://t.co/se5sPgXyNL pic.twitter.com/INEacK4vao
— ABP माझा (@abpmajhatv) November 2, 2021
Anil Deshmukh Arrested : अनिल देशमुख जेजे रुग्णालयात
13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली होती. अनिल देशमुख यांना ईडी आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यापूर्वी वैद्यकीय चाचणीसाठी जेजे रुग्णालयात नेण्यात आलं आहे.
Ajit Pawar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तांवर आयकरची कारवाई
नितेश राणे यांचं सूचक ट्वीट
13 तासांच्या चौकशीनंतर अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली आहे. अनिल देशमुख यांच्या अटकेनंतर भाजप नेते नितेश राणे यांनी सूचक ट्विट केलं आहे.
अनिल देशमुख यांना दिवाळीच्या शुभेच्छा! नवाब मलिक आणि संजय राऊत यांचे विशेष धन्यवाद