एक्स्प्लोर

Breaking News LIVE : परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Breaking News LIVE Updates, 21 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

LIVE

Key Events
Breaking News LIVE : परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

Background

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा 
तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज,शुक्रवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. तोक्ते चक्रीवादळमुळे कोकणात अनेक गावात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत, तसेच प्रशासनाकडून नुकसानीचा आढावाही घेणार आहेत. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारात त्यांच्या या दौऱ्यास सुरुवात होत आहे. 

गुरुवारी राज्यात 47,371 रुग्ण बरे होऊन घरी तर 29,911 नवीन रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना उतरणीला लागला आहे. दैनंदिन येणाऱ्या आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. यामुळं मोठा दिलासा मिळत आहे. आज 47371 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 29911 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे.  आजपर्यंत एकूण 5026308 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 91.43% एवढे झाले आहे.

NEGVAC नं 1 जूनपर्यंत घरोघरी जाऊन लसीकरण करण्याबाबत निर्णय घ्यावा : हायकोर्ट
मुंबई महानगरपालिकेच्या भूमिकेनं आमची घोर निराशा केली, या शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं आपली नाराजी व्यक्त केली आहे. घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास बीएमसी तयार आहे मात्र केंद्र सरकारनं त्यासाठी नियमावली जारी करण्याची गरज आहे. अशी भूमिका गुरूवारी मुंबई पालिकेच्यावतीनं हायकोर्टात व्यक्त केली. तसेच घरोघरी जाऊन लसीकरण करण्यासाठी त्याप्रमाणात लसींचा साठा सध्या आमच्याकडे उपलब्ध नाही असंही पालिकेनं हायकोर्टात सांगितलं. मात्र हे यासाठीच कारणच असू शकत नाही, कारण लसींचा साठा कमीय म्हणून लसीकरणच बंद आहे का?, ते साठ्यानुसार सुरूचं आहे तर मग त्याच प्रमाणात घरोघरी जाऊन काही व्यक्तींना लस द्यायला काय हरकत आहे?, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. दरम्यान यासंदर्भात 'नेगवॅक' ला 1 जूनपर्यंत निर्णय घेण्याचे निर्देश बुधवारी हायकोर्टानं देत यासंदर्भातील सुनावणी 2 जूनपर्यंत तहकूब केली आहे.

00:10 AM (IST)  •  22 May 2021

परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करू नका, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश, रात्रा 12 वाजता न्यायमूर्ती काथावाला यांनी कामकाज थांबवलं, प्रकरणाची सुनावणी अपूर्ण राहिल्यानं परमबीर यांना तूर्तास अटकेपासून दिलासा, सोमवारी सकाळी 10 वाजता पुन्हा घेणार सुनावणी

23:32 PM (IST)  •  21 May 2021

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या कोर्टात एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा 12 तासांचं मॅरेथॉन कामकाज

न्यायमूर्ती शाहरूख काथावाला यांच्या कोर्टात एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा 12 तासांचं मॅरेथॉन कामकाज, 

इतकं उशिरापर्यंत कामकाज चालवल्याबद्दल आमच्यावर टिकाही होते. परंतु त्याच झाडावर दगड मारले जातात ज्या झाडावर फळं लागतात - न्या. काथावाला

20:24 PM (IST)  •  21 May 2021

राज्यात आज 44,493 रुग्णांना डिस्चार्ज तर 29,644 नवीन कोरोना रुग्णांचं निदान, आज राज्यात 555 कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज 44,493 रुग्णांना डिस्चार्ज तर 29,644 नवीन कोरोना रुग्णांचं निदान, आज राज्यात 555 कोरोनाबाधितांचा मृत्यू

19:18 PM (IST)  •  21 May 2021

नाशिकचा कडक लॉकडाऊन 23 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार

नाशिकचा कडक लॉकडाऊन 23 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार,  24 तारखेपासून राज्य सरकारच्या ब्रेक दि चेन चे निर्बंध कायम राहणार, जिल्ह्यातील बाजार समिती, औद्योगिक कंपन्या सोमवार पासून सुरू होणार, पालकमंत्री छगन भुजबळ आणि अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीतील निर्णय, 12 तारखेपासून 23 पर्यंत जिल्ह्यात लागू आहे कडक लॉकडाऊन, कोरोना रुग्ण संख्या वाढीचा वेग कमी झाल्याने नाशिककरांना काही प्रमाणात दिलासा

14:38 PM (IST)  •  21 May 2021

'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा आहे. 'ब्रेक द चेन' अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत मिळणार आहे. राज्यात आतापर्यंत 48 लाखांहून अधिक नागरिकांनी नि:शुल्क जेवणाचा लाभ घेतला. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 81 हजार 306 थाळ्यांचे वितरण झालं आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget