Breaking News LIVE : उजनीच्या जलाशयात शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांचं जलसमाधी आंदोलन
Breaking News LIVE Updates, 1 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
पंढरपूर मध्ये बालकांच्या कोविड चाचण्या पॉझिटीव्ह येऊ लागल्याने आता लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव पुढे आला आहे
पंढरपूर मध्ये बालकांच्या कोविड चाचण्या पॉझिटीव्ह येऊ लागल्याने आता लहान मुलांच्या कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव पुढे आला आहे . कोरोनाबाधित गरोदर महिला, प्रसूतीनंतर नवजात बालके आईचे दूध पिऊन कोरोना ग्रस्त होऊ लागलं आहेत . त्यामुळे अशा लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलचा प्रस्ताव आला आहे
शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांचं जलसमाधी आंदोलन
उजनीच्या पाण्यावरुन आज महाराष्ट्र दिनी उजनी जलाशयात पोलिसांना चकवा देत शिवसेनेच्या संजय बाबा कोकाटे यांनी जलसमाधी आंदोलन केलं. पुणे जिल्ह्यातील पाच टीएमसी सांडपाणी उजनी धरणातून इंदापूर तालुक्यात देण्याचा निर्णय झाला. यानंतर सोलापूर जिल्ह्यातून याला प्रचंड विरोध सुरु झाला असून सर्वपक्षीय नेत्यांनी यास विरोध करण्यास सुरुवात केली आहे. उजनी संघर्ष समितीसह अनेक संघटनांनी आज उजनी जलाशयात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आज शिवसेनेचे संजय बाबा कोकाटे यांनी आज पोलिसांना चकवा देत उजनी जलाशयात कार्यकर्त्यांसह जलसमाधी आंदोलन केलं.
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ, कोरोना लसीचा दुसरा डोस न मिळाल्याने नागरिकांचा संताप
नाशिकच्या इंदिरा गांधी रुग्णालयात गोंधळ झाला आहे. लस मिळत नसल्याने नागरिक आक्रमक झाले असून महापालिका रुग्णालयात पोलिसांना पाचारण करावं लागलं. कोवॅक्सिन लस उपलब्ध नसल्यामुळे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्यांना लस मिळत नाही. इंदिरा गांधी रुग्णालयात आज केवळ 18 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस देण्याचं नियोजन करण्यात आलं आहे.
पुण्यातील लसीकरण केंद्रावर गोंधळ, वेळ आणि केंद्र निश्चित नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम
पुण्यातील लसीकरण केंद्रावर आजही गोंधळ कायम आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी पुणे जिल्ह्यात 20 हजार लस उपलब्ध झाल्या आहेत. त्यानुसार पुणे जिल्ह्यात फक्त 19 केंद्र सुरु असून 2 केंद्र पुण्यात आहेत. त्यामध्ये कमला नेहरु रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येरवडा येथे आजच्या दिवशी लसीकरण केलं जाणार आहे. शहरात एकूण 700 नागरिकांना लस दिली जाणार आहे. मात्र अनेकांनी नोंदणी केली असली तरी नियोजन केंद्र आणि वेळ निश्चित होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळ कायम असून नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
महाराष्ट्र दिनी मुंबईकरांसाठी दिलासा, कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला
महाराष्ट्र दिनी मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णवाढीचा दर घसरला आहे. 1 एप्रिल कोरोनाबाधित रुग्णांचं प्रमाण 20.85 टक्के होतं तर 29 एप्रिल रोजी रुग्णांचं प्रमाण 9.24 टक्क्यांवर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
