एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Breaking News LIVE : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द

Breaking News LIVE Updates, 26th June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE : जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द

Background

राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढतेय; कोल्हापूर हॉटस्पॉटच्या मार्गावर

मुंबई : राज्यात निर्बंध शिथिल केल्यानंतर काही दिवसांनंतर पुन्हा एकदा काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. राज्यात काल दिवसभरात 9,812 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,752 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1551 रुग्ण आढळले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा हॉटस्पॉटच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता सोमवारपासून राज्यात नवीन निर्बंधांची घोषणा करण्यात आली आहे.

दुसऱ्या लाटेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्ग पसरला होता. या तीन्ही जिल्ह्यात रोज हजारच्या घरात नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद होत होती. शासनाने कडक निर्बंध लावल्यानंतर तीन्ही जिल्ह्याची दैनदिन रुग्णसंख्या हजारच्या आत आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा कोल्हापूर जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी (26 जून) जिल्ह्यात 1551 नवीन बाधित आढळले आहेत तर 21 मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे प्रशासनाच्या चिंता वाढल्या असून कडक निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे.

सोमवारपासून दुपारी चारनंतर महाराष्ट्र बंद! 

Maharashtra Corona : राज्यामध्ये कोरोनाची (Maharashtra Corona Update) आकडेवारी कमी झाल्यानंतर सरकारनं पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले होते. मात्र निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर काही दिवसातच कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं समोर येत आहे. सोबतच राज्यात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका देखील वाढू लागला आहे. त्यामुळं राज्य सरकारकडून आधीच्याच नियमावलीमध्ये नवीन बदल केले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वरच ठेवण्यासंदर्भात राज्य सरकारनं निर्णय जारी केला आहे.

कोरोना आणि लसीकरण मोहिमेवर पंतप्रधान मोदींची आढावा बैठक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस आणि लसीकरण मोहिमेवर आढावा बैठक घेतली. या बैठकीला कोरोना टास्क फोर्सचे अधिकारी व पीएमओचे अधिकारी उपस्थित होते. पंतप्रधानांनी आतापर्यंतच्या झालेल्या लसीकरणाची आणि लसींची उपलब्धता तसेच येत्या काही महिन्यांत राज्यांना लसींचा पुरवठा यासह लसीकरण मोहिमेच्या संभाव्य कालवधीची माहिती घेतली.

सरकारी सूत्रांच्या म्हणण्यानुसार लसीकरणाची संपूर्ण व्यवस्था हातात घेतल्यानंतर आता केंद्र सरकारला याच वेगाने लसीकरण करण्याची इच्छा आहे. यावर्षी डिसेंबरच्या आधीच देशातील संपूर्ण लोकसंख्येचं लसीकरण करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे. 

20:25 PM (IST)  •  27 Jun 2021

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द

जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अखेर रद्द. राष्ट्रवादी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांना संवाद साधण्यासाठी काढण्यात आलेली व नांदेड जिल्ह्यात पोहचलेली राष्ट्रवादी परिसंवाद यात्रा डेल्टा व्हाइरसच्या वाढत्या प्रभावामुळे अखेर रद्द झालीय. त्यामुळे यापुढील ही परिसंवाद यात्रा नांदेड जिल्ह्यातच थांबवून, राष्ट्रवादीचा हा परिसंवाद यात्रा मागे फिरणार असल्याची माहिती मंत्री जयंत पाटील यांच्या स्वीय सहाय्यकांनी दिलीय.

19:48 PM (IST)  •  27 Jun 2021

पुढील तीन तासात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात सर्वदूर पाऊस, पुढील तीन तासात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड, जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात देखील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित, मान्सून ब्रेक आधी पावसाची अनेक ठिकाणी मोठी हजेरी

18:19 PM (IST)  •  27 Jun 2021

सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून नवे निर्बंध, शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी

सोलापूर - सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात उद्यापासून नवे निर्बंध, शहरातील सर्व दुकानांना आता संध्याकाळी 4 पर्यंत परवानगी,  बिगर अत्यावश्यक सेवा शनिवार-रविवार संपूर्ण बंद,  मॉल्स, थिएटर संपूर्णपणे बंद,  सोमवार ते शुक्रवार पर्यंत हॉटेल्स रेस्टॉरंट संध्याकाळी 4 पर्यंत त्यानंतर रात्री 11 पर्यंत केवळ पार्सलची सुविधा, सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात संध्याकाळी 5 पर्यंत जमावबंदी तर 5 नंतर संचारबंदी, पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांचे आदेश जारी, उद्या सकाळी 7 पासून आदेश लागू

16:15 PM (IST)  •  27 Jun 2021

तब्बल साडेसहा तासानंतर मुंबई - गोवा हायवेवरील वाहतूक सुरु

तब्बल साडेसहा तासानंतर मुंबई - गोवा हायवेवरील वाहतूक सुरु, लांजा तालुक्यातील वेरळ घाटात मशीन घेऊन जाणारा ट्रेलर पलटी झाल्यानं खोळंबली होती वाहतूक

12:55 PM (IST)  •  27 Jun 2021

उच्च व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या भेटीनंतर प्राध्यापक संघटनेचा पुण्यातील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय 

21 जूनपासून पुण्यात प्राध्यापक भरतीसाठी आंदोलन सुरू होते, ते आता उच्च व तंत्रज्ञान मंत्र्यांच्या भेटीनंतर मागे घेण्याचा निर्णय प्राध्यापक संघटनेनं घेतला आहे. तीन हजार 74 प्राध्यापक भरतीची फाईल मान्यता पुढील आठवडाभरात होईल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली आहे. मानधन आणि अजून काही मागण्या होत्या, त्याही काही मान्य करण्यात आल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale Exclusive : मंत्रि‍पदासाठी शिवलेला कोट आता तरी घालणार? भरत गोगावले म्हणतातBharat Gogawale on Uddhav Thackeray :उद्धव ठाकरेंचे आमदार संपर्कात पण लगेच काही करणं बरोबर दिसत नाहीMahayuti CM Oath Ceremony : शपथविधी कधी पर्यंत झाला पाहिजे? कायदेशीर बाजू नेमकी काय?Sunil Shelke Meet Ajit Pawar : अजितदादांनी सांगितला मोदी-शेळकेंच्या भेटीचा किस्सा #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akaay Kohli Photo Viral : विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
विराट-अनुष्काच्या लेकाची पहिली झलक? अकाय कोहलीचा फोटो व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 नोव्हेंबर 2024 | रविवार
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
Maharashtra Assembly Election Results 2024 : महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
महायुतीच्या बटेंगे तो कटेंगे अन् एक है तो सेफ है च्या नाऱ्यातही किती मुस्लीम उमेदवारांना विजयी गुलाल?
IPL Auction 2025 : युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
युजवेंद्र चहलला लॉटरी, टीम इंडियात संधी मिळेना पण आयपीएलमध्ये पैशांचा वर्षाव, पंजाबकडून 18 कोटी खर्च
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
ठाकरेंचा एकमेव मुस्लीम उमेदवार बनला आमदार; हारुण खान यांना खेचून आणला विजय, मताधिक्य किती?
Maharashtra Assembly Election Result 2024 : फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
फक्त 162 मतांनी महायुतीच्या त्सुनामीत विजय खेचून आणलेला 'नशीबवान' उमेदवार माहीत आहेत का?
Dhule Rural Vidhan Sabha Election Result 2024 : अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
अवघ्या 32 वर्षीय राम भदाणेंनी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला लावला सुरुंग, 66 हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय
Embed widget