Breaking News LIVE : राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, रॅकेटच्या कारभाराबाबत कुंद्राच्या कर्मचाऱ्यांची प्रॉपर्टी सेलला सविस्तर माहिती
Breaking News LIVE Updates, 25 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
LIVE
Background
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज चिपळूण दौऱ्यावर, चिपळूण बाजारपेठ आणि पूरग्रस्त भागाचा करणार पाहणी दौरा, 11.30 वाजता चिपळूणमध्ये मुख्यमंत्री येणार, चिपळूणनंतर जाणार साताऱ्याला
आम्ही कोणाला सुरुंग लावत नाही, मात्र तेच आम्हाला सुरुंग लावण्याची संधी देतात : गुलाबराव पाटील
राज कुंद्राच्या अडचणीत वाढ, रॅकेटच्या कारभाराबाबत कुंद्राच्या कर्मचाऱ्यांची प्रॉपर्टी सेलला सविस्तर माहिती
अमरावती जिल्ह्यातील पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश
अमरावती : जिल्ह्यातील पिकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. कृषिमंत्री यांनी आज पिकविमा कंपनीच्या इक्को टोकियो कार्यालयात भेट दिली, त्यावेळी तिथे गोदाम सारखी स्थिती आढळली. आधी कृषिमंत्री यांना जिल्हा कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात पिकविमा कार्यालय असल्याचं सांगितलं. पण तिथं गेल्यावर कार्यालयच नव्हतं. त्यामुळे कृषिमंत्री चांगलेच संतापले. जिथं कार्यालय आहे. तिथं मला घेऊन चला म्हटल्यावर कृषी अधिकारी आणि पिकविमा अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली.
पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राच्या कार्यालयात आढळलं छुपं कपाट
Raj Kundra : पॉर्न फिल्म प्रकरणात गुन्हे शाखेला राज कुंद्राची छुपी अलमारी सापडली. काल (शनिवारी) मुंबई गुन्हे शाखेने राज कुंद्राच्या व्हियान आणि जेएल स्ट्रीमच्या कार्यालयात पुन्हा छापा टाकला. त्या कार्यालयात गुन्हे शाखेला एक छुपं कपाट सापडलं. क्राईम ब्रँचला या कपाटातून बऱ्याच बॉक्स फाईल आढळून आल्या आहेत. गुन्हे शाखेला त्या फाईलमध्ये क्रिप्टो करन्सीशी संबंधित माहिती मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.