Breaking News LIVE : टेस्टिंगला सहकार्य करा, अन्यथा कठोर पाऊलं उचलावी लागतील; कल्याण डोंबिवली मनपा आयुक्तांचा इशारा
Breaking News LIVE Updates, 8 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार
आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प असणार आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा वेळी मोठ्या खर्चाला कात्री लागण्याची शक्यता आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.
मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्वाचा दिवस
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रकरणाबाबत सुप्रीम कोर्टात आज महत्त्वाचा दिवस आहे. सोमवारी सकाळी 10.30 वाजता सुप्रीम कोर्टाच्या कोर्ट नंबर 7 मध्ये मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीला सुरूवात होत आहे. 5 फेब्रुवारीला या प्रकरणात शेवटची सुनावणी झाली होती, त्यावेळी कोर्टाने 8 मार्च ते 18 मार्च असे वेळापत्रक सुनावणीसाठी आखलेलं आहे. पण, दरम्यानच्या काळात हे प्रकरण अकरा न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालवण्यात यावे अशी याचिका राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे.
मनसुख हिरेन प्रकरणी एटीएसकडून हत्येचा गुन्हा दाखल
मनसुख हिरेन प्रकरणी महाराष्ट्र एटीएसने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तपास दहशतवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान, आज एटीएसचं पथक मनसुख हिरेन यांच्या घरी चौकशीसाठी दाखल झालं होतं. त्यावेळी मनसुख हिरेन यांची आत्महत्या नसून हत्या झाली असल्याचा आरोप हिरेन यांच्या कुटुंबियांनी केला होता. आज अखेर विमला हिरेन यांच्या फिर्यादिवरुन मनसुख हिरेन प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभिनेते मिथुन चक्रवर्तींचा नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत भाजप प्रवेश
बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या बऱ्याच दिवसांपासून मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. अशातच आज अखेर अधिकृतपणे मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला. त्यांनी कोलकाताच्या ब्रिगेड मैदानामध्ये पंतप्रधान मोदींच्या रॅलीमध्ये मंचावर भाजपचा झेंडा फडकावत पक्षप्रवेश केला. या दरम्यान बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष आणि कैलास विजयवर्गीय मंचावर उपस्थित होते.