Breaking News LIVE : हिंगोलीत 1 ते 7 मार्च दरम्यान संचारबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Breaking News LIVE Updates, 27 February 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
दहावी, बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर
राज्यातील कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी पालक व विद्यार्थ्यांकडून होत होती. मात्र, राज्य मंडळाकडून 16 फेब्रुवारीला जाहीर केलेल्या संभाव्य वेळापत्रकावर मागवण्यात आलेल्या सूचनांनतर शुक्रवारी दहावी, बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार असल्याचे राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पुणे लीगल जस्टीस सोसायटीच्या वतीने खासगी खटला दाखल करण्यात आला आहे. अॅड. भक्ती राजेंद्र पांढरे (वय 24) यांनी लष्कर न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.पूजा चव्हाण यांचा मृत्यू संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास आरोपीद्वारा यातील पुरावे नष्ट करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करावी आणि तपास करावा यासाठी न्यायालयाचे आदेश आवश्यक असल्याचे याद्वारे भक्ती पांढरे यांनी न्यायालयामोर मांडले.
बंगाल, केरळसह 5 राज्यात निवडणुका जाहीर; पश्चिम बंगालमध्ये तब्बल 8 टप्प्यात होणार मतदान
निवडणूक आयोगाकडून देशातील पाच राज्यांच्या निवडणुकींच्या तारखा घोषित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी केंद्र शासित प्रदेशाचा समावेश आहे. या राज्यांमधील निवडणुका पाहता निवडणूक आयोगाच्या पथकांनीही नुकतीच या राज्यांना भेटी दिल्या आहेत.