Breaking News LIVE | जालना पोलिसांकडून 10 किलो चांदी,12 तोळे सोने अन् रोख रक्कम 13 लाख 38 हजारांचा मुद्देमाल जप्त
Breaking News LIVE Updates, 22 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Bigg Boss 14 Winner Rubina Dilaik : रुबिना दिलैक बनली बिग बॉस 14 ची विजेती
Bigg Boss 14 : Rubina Dilaik बिग बॉस 14 ची विजेती बनली आहे. सोशल मीडियावर आधीच याबाबत शक्यता व्यक्त केली जात होती की यावेळची विजेती Rubina Dilaik असेल आणि तसंच झालं. राहुल वैद्यला पराभूत करत तिने बिग बॉसच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. राहुल वैद्य बिग बॉस सीझन 14 चा पहिला उपविजेता ठरला आहे तर निक्की तांबोळी दुसरी उपविजेती ठरली आहे.
पेट्रोल-डिझेल की मार, क्या यहीं अच्छे दिन है यार? युवासेनेचा केंद्र सरकारला पोस्टरमधून सवाल
वाढत्या महागाईविरोधात युवासेनेकडून भाजप आमदार आशिष शेलार यांचा मतदारसंघ असलेल्या वांद्रे पश्चिम पोस्टरबाजी होत असल्याचं बघायला मिळत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीविरोधात वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातील पेट्रोल पंपांवर युवासेनाच्या कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे.. वांद्रे पश्चिम, खार आणि सांताक्रूझमधल्या सर्व पेट्रोल पंम्पांवर हे पोस्टर मध्यरात्रीच्या सुमारास लावण्याचं काम सुरु होतं. या पोस्टरमध्ये ‘यही है अच्छे दिन?’ असा प्रश्न उपस्थित करत मागील मोदी सरकार पहिल्या टर्मची आणि मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मच्या दरवाढीची तुलना करण्यात आली आहे. यात 2015 साल आणि 2021 मधल्या गॅस, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींच्या दरवाढीची तुलना केली गेली आहे. ज्यात मोठ्या प्रमाणात 2015 साल आणि 2021 सालच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरांमध्ये फरक असल्याचं म्हणत युवासेना कार्यकर्तांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. वाढत्या महागाईविरोधात निषेध नोंदवण्यासाठी ही पोस्टरबाजी केली जात असल्याचं वांद्र्यातील युवासेना कार्यकर्ते अक्षय पानवलकर यांनी स्पष्ट केलं आहे. आताच्या महागाईच्या अच्छे दिनपेक्षा आधीचे वाईट दिवसही चालतील म्हणत युवासेना कार्यकर्ते श्याम जैस्वाल यांनी केंद्राला टोला लगावला आहे.
राजकीय, धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक नियम करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. कोरोना संसर्ग टाळण्यासाठी कठोर पावले उचलण्यासा सुरुवात करण्यात आली असून उद्यापासून सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले.