Breaking News LIVE | शेतकरी नेते राकेश टीकेत यवतमाळच्या महापंचायत मध्ये येणार नाहीत
Breaking News LIVE Updates, 19 February 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Breaking News LIVE | शेतकरी नेते राकेश टीकेत यवतमाळच्या महापंचायत मध्ये येणार नाहीत Breaking News LIVE | शेतकरी नेते राकेश टीकेत यवतमाळच्या महापंचायत मध्ये येणार नाहीत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/02/19123208/LIVE_BLOG_FeaturePhoto.jpg)
Background
Rajesh Tope | आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण
मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असून स्वतः आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात ट्वीट करुन माहिती दिली आहे. आरोग्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आणि लक्षणं आढळल्यास तत्काळ चाचणी करुन घेण्याचं आवाहनही केलं आहे.
भारतीय संस्कृतीनुसार स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालीनतेला हात घालणं : मुंबई सत्र न्यायालय
मुंबई : भारतीय संस्कृतीमध्ये एका स्त्रीच्या कमरेखाली हात लावणं म्हणजे तिच्या शालिनतेला हात घालणंच. गुगलमध्ये जरी त्याचा खाजगी भाग असा उल्लेख नसला तरी इथं तो गुन्हाच आहे, असं महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पोक्सो कोर्टानं नोंदवलं आहे. न्यायधीश अभिजीत नांदगावकर यांनी एका प्रकरणात 10 वर्षीय मुलीच्या पार्श्वभागाला स्पर्श केल्याच्या आरोपाखाली एका 22 वर्षीय आरोपीला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. आरोपीनं लैंगिक भावना मनात ठेवूनच या मुलीच्या पार्श्वभागाला हात लावल्याचं इथं सिद्ध होत आहे, असंही न्यायालयानं आपल्या निकालात नमूद केलं आहे.
शिवजयंतीनिमित्त रायगडावर केलेल्या रोषणाई वरून खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याला फटकारलं
पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाई वरून खासदार संभाजीराजे यांनी ट्विट करून पुरातत्व खात्याला फटकारले आहे. या संदर्भात खासदार संभाजीराजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहीत या गोष्टीचा निषेध केला आहे. दरम्यान, या विषयावर सविस्तर भूमिका मांडण्यासाठी उद्या (19 फेब्रुवारी) रोजी शिवनेरी किल्ल्यावर पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे पत्रकार बांधवांशी संवाद साधणार आहेत. "भारतीय पुरातत्त्व विभागाने 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल. त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो", अशा भावना खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केल्या आहेत.
राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण : उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा
मुंबई : राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह 65 संचालकांना दिलासा मिळाला आहे. सहकार विभागाच्या अहवालामध्ये अजित पवार यांच्यासह 65 संचालकांना क्लिन चिटस देण्यात आली आहे. यापूर्वी एसआयटीनेही अजित पवार यांच्यासह राज्य सहकारी बँकेवरील 75 जणांना क्लीन चीट दिली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरण समोर आलं होतं. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना दिलासा मिळाला आहे. राज्याच्या सहकार विभागाने राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना केली होती. या समितीने आपला अहवाल सहकार आयुक्तांकडे सादर केला आहे. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चौकशी समितीच्या अहवालात अजित पवार, हसन मुश्रीफ यांच्यासह तत्कालीन 65 संचालकांना दिलासा देण्यात आलेला आहे. याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, बँकेचे तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, आनंदराव आडसूळ आदिंच्या नावाचा समावेश करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)