Covid 19 Vaccination Free Breaking News LIVE : राज्यातील नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण करावे, कॅबिनेटमध्ये काँग्रेसने मांडली आग्रही भूमिका
Breaking News LIVE Updates, 28 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..
LIVE
Background
Bhandup Dream Mall Fire : सनराईज रुग्णालयाला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार, रुग्णालय पुन्हा सुरु करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी कोर्टानं फेटाळली
Bhandup Dream Mall Fire : भांडूप परिसरातील ड्रिम्स मॉलमध्ये चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या सनराईज कोविड रुग्णालयाला 25 मार्च रोजी रात्री उशीरा आग लागली होती. या आगीत 11 रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. त्याप्रकरणी ड्रिम्स मॉलचे मालक आणि सनराईज कोविड रुग्णालयाचे मालक असलेल्या प्रिविलेज हेल्थकेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
PM Modi on coronavirus : कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उच्चस्तरिय बैठका
देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. देशातील ऑक्सिजनची उपलब्धता, औषधे, आरोग्यविषयक पायाभूत सुविधा इत्यादींचा या बैठकीत आढावा घेण्यात आला. देशात ऑक्सिजनची उपलब्धता आणि पुरवठा वाढवण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना दिली.
राज्यांना वितरित केल्या जात असलेल्या ऑक्सिजनमध्ये होत असलेल्या वाढीची माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. देशातील द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे उत्पादन ऑगस्ट 2020 मध्ये दररोज 5700 मेट्रिक टन इतके होत असे, ते 25 एप्रिल रोजी 8922 मेट्रिक टन इतके झाले असल्याविषयी यावेळी चर्चा झाली. द्रवरूप वैद्यकीय ऑक्सिजनचे देशान्तर्गत उत्पादन एप्रिल 2021 अखेरपर्यंत प्रतिदिनी 9250 मेट्रिक टनापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
भय नको, पण आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणाही नको! देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
कोरोनाचे भय वाढणार नाही, याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही. त्यामुळे चाचण्यांच्या तुलनेत संसर्ग दर आणि अचूक बळीसंख्या यातूनच कोरोनाविरोधातील लढ्यासाठी योग्य आधार प्राप्त होऊ शकतो, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितले आहे
शिरुरमधील विशेष मुली आणि महिलांसाठी निवासी वसतीगृहात कोरोनाचा प्रकोप
पुणे जिल्ह्यातील शिरुरमधे विशेष मुली आणि महिलांसाठी निवासी वसतीगृह चालवले जाते. या वसतिगृहातील 58 पैकी 48 विशेष मुली स्टाफमधील 8 केअर टेकर्स कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. या सर्वांवर शिरुरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार असुन सर्व मुली आणि महिलांची तब्येत व्यवस्थित आहे.
थोड्याच वेळात कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात
थोड्याच वेळात कोविन ॲपवर तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण नोंदणीला सुरुवात
कोरोना पेशंट असलेल्या संतोष पाटीलचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न
नवी मुंबई : कोरोना पेशंट असलेल्या संतोष पाटीलचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न, १४ व्या माळ्यावरून आत्महत्या करण्यासाठी संतोष पाटील खिडकीत उभा,गेल्या आठवड्यात पत्नीचा कोयत्याने खून केल्या प्रकरणी संतोष पाटीलला केली होती अटक, कोरोना पाॅझिटीव्ह असल्याने पनवेल येथील इंडिया बूल कोरोना सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले होते
Covid 19 Vaccination Free : राज्यातील नागरिकांचे सरसकट मोफत लसीकरण करावे, कॅबिनेट मध्ये काँग्रेसने मांडली आग्रही भूमिका
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केंद्र सरकारने नागरिकांना कोरोनाची लस मोफत द्यावी अशी भूमिका मांडली होती. या भूमिकेनुसार राज्यातील नागरिकांना देखील मोफत लस देण्यात यावी यासाठी काँग्रेस आग्रही आहे. आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांनी ही भूमिका मांडली. राज्यात मोफत लसीकरण केलं तर 6500 कोटींचा भार राज्य सरकारला उचलावा लागेल.
काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळे निधन
मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे वडील एकनाथ गायकवाड यांचं कोरोनामुळं निधन झालं. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. तिथंच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी सकाळी 10 वाजता त्यांचं निधन झाल्याचं म्हटलं जात आहे. मागील काही दिवसांपासून त्रास होत असल्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत.