एक्स्प्लोर

Breaking News LIVE : मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक

Breaking News LIVE Updates, 30 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Breaking News LIVE :  मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक

Background

राज्यात मंगळवारी 8,085 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 231 जणांचा मृत्यू

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात काल (29 जून) 8,085 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 8 हजार 623 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण 58 लाख 9 हजार 548 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 1 लाख 17 हजार 098 अॅक्टिव रुग्ण आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 4 कोटी 13 लाख  98 हजार 501 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 60 लाख 51 हजार 633 (14.62 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 21 हजार 836 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 3 हजार 584 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 

Whip: 'अधिवेशन संपेपर्यत आमदारांनी सभागृहात उपस्थित राहा', शिवसेनेकडून व्हिप जारी

राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 व 6 जुलै 2021 असे दोनच दिवस घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आमदारांना अधिवेशन संपेपर्यत आमादारांनी सभागृहात उपस्थित राहावे, असा व्हिप आपल्या आमदारांना बजावला आहे. शिवसेनेकडून मंगळवारी (29 जून) आपल्या आमदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करण्यात आला आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की, "राज्याचे पावसाळी अधिवेशन पाच आणि सहा जुलैला होत आहे. अधिवेशनात पुरवणी मागण्या शासकीय कामकाज आणि पुरवणी विनियोजन विधेयके यावर चर्चा मतदान करुन मंजूर करण्यात येणार आहे. त्यामुळे या अधिवेशनात आमदारांनी संपूर्ण दिवस उपस्थित राहावं असा पक्षादेश आहे". हा व्हिप शिवसेनेचे प्रतोद आमदार सुनील प्रभू यांनी यांनी शिवसेना विधीमंडळ पक्षनेते कार्यालय या पत्राद्वारे जारी करण्यात आला आहे. 

'निकोटीन' कोरोनापासून बचावासाठी परिणामकारक; जाणकारांच्या समितीचा अहवाल हायकोर्टापुढे सादर

धुम्रपानामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी होतो. उलट त्यातील `निकोटीन’ हा कोरोना रोखण्यासाठी महत्वाचा घटक असल्याचा दावा करणारा हस्तक्षेप अर्ज मंगळवारी फेडरल रिटेलर असोसिएशन आणि पान-बिडी-तंबाखू विक्रेता संघाच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आला. त्याची दखल घेत या दाव्यात तथ्य आढळल्यास केंद्र सरकारला आता सिगरेटसह अन्य तंबाखूच्या पाकिटांवरुन वैधानिक इशारा काढायला हरकत नाही, असा खोचक टोला हायकोर्टानं लगावला. मात्र हा हस्तक्षेप अर्ज दाखल करुन घेत त्यांना सविस्तर युक्तिवाद सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

रेव्ह पार्टी प्रकरणी अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ

इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात अभिनेत्री हिना पांचाळसह 25 जणांच्या पोलीस कोठडीत 6 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. सोमवारी 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनवल्यानंतर काल (29 जून) कोर्टात हजर केलं होतं. यात 1 इराणी कोरिओग्राफर महिला आणि 4 साऊथ सिनेमात काम केलेल्या अभिनेत्रींची समावेश आहे. कोरोना नियम उल्लंघन, मद्य सेवन, तंबाखूजन्य पदार्थ यांचं सेवन करताना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. रेव्ह पार्टीत ड्रग्स वापर करणाऱ्यांसोबत यांच्या कनेक्शनचा तपास करण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टानं केली होती. ही मागणी मान्य करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत.

23:14 PM (IST)  •  30 Jun 2021

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक

मुंबईत बोगस लसीकरण करणाऱ्या आरोपीला बारामतीतून अटक करण्यात आली आहे.  राजेश पांडे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  मुंबईत भेसळयुक्त द्रव हे कोविडची लस असल्याचे भासवून नागरिकांसाठी लसीकरण केलं होतं. सोबतच वेगवेगळ्या नामांकित हॉस्पिटलचे नागरिकांना प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती. राजेश पांडेला बारामतीतील भिगवण रोडवरील अमृता लॉज वरून अटक केली आहे. कांदिवली पोलिसांची टीम आरोपीला ताब्यात घेण्यासाठी बारामतीला रवाना झाली आहे. 

21:38 PM (IST)  •  30 Jun 2021

पुरेशा लस उपलब्ध नसल्याने उद्या मुंबईत लसीकरण बंद राहणार

कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या गुरुवार1 जुलै  रोजी लसीकरण बंद राहणार आहे.

20:19 PM (IST)  •  30 Jun 2021

राज्यात 9,771 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 141 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज 9771 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 हजार 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आज 141 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.01 टक्के एवढा आहे.

18:40 PM (IST)  •  30 Jun 2021

पुणे महापालिकेत 23 गावांचा अखेर समावेश, राज्य शासनाकडून अद्यादेश जारी

पुणे महापालिकेत 23 गावांचा अखेर समावेश, राज्य शासनाकडून अद्यादेश जारी, यामुळे आता पुणे महापालिका क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठी महापालिका झालीय.

17:59 PM (IST)  •  30 Jun 2021

मु़ख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी महाविकास आघाडीच्या समन्वय समिती नेत्यांसोबत महत्वाची बैठक सुरू

मु़ख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत वर्षा निवास्थानी महाविकास आघाडीच्या समन्वय समिती नेत्यांसोबत महत्वाची बैठक सुरू. या बैठकीला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित, बैठकीत पावसाळी अधिवेशन संदर्भातील रणनिती तसेच विधान सभा अध्यक्ष पद निवडणुकी संदर्भात महत्वाची चर्चा होतेय.'

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sushma Andhare  : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारेAjit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवारNCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेटSandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahakumbh 2025 : राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
राहुल गांधी आणि प्रियांका कुंभमेळ्यात जाणार की नाहीत? काँग्रेसकडून पहिल्यांदाच खुलासा!
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
धनंजय मुंडे-सुरेश धस भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, भेट घेतली तरी हेतू एकच...
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
शरद पवारांनंतर ज्यांना मी आपला नेता मानतो, आव्हाडांची जयंत पाटलांसाठी खास पोस्ट; पडळकरांच्याही शुभेच्छा
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
मेट्रोखालील उड्डाणपुलास 'रतन टाटांचे नाव' द्या; मनसेचं आंदोलन, मंत्रीमहोदयांना निवेदन
Jaya Kishori on Mahakumbh : 'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
'महाकुंभात डुबकी घेऊन पापं धुतली जात नाहीत, तीच पापं धुतली जातात...' जया किशोरी म्हणाल्या तरी काय?
Elon Musk : अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
अवघ्या तीन दिवसांपूर्वीच पीएम मोदींची सहकुटुंब भेट अन् आज एलाॅन मस्क यांचा थेट भारताला दणका!
Nashik Crime : चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
चॉपरने केक कापणं भोवलं, 'बर्थडे बॉय'ला नाशिक पोलिसांनी दाखवला चांगलाच इंगा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदुर रोटी बंद; हॉटेल्स, बेकर्स अन् रेस्टॉरंट चालकांना महापालिकेच्या नोटीसा
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.