Breaking News LIVE : साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन
Breaking News LIVE Updates, 3 May 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्सचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये... देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट्स केवळ एका क्लिकवर...
LIVE
Background
विरोधी पक्षांचं केंद्राला पत्र, मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह
देशातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता विरोधी पक्षांनी रविवार (2 मे) केंद्र सरकारला मोफत लसीकरण अभियान चालवण्याचा आग्रह केला. याबाबत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेसह इतर राज्यातील प्रादेशिक पक्षांनी एकत्रित पत्रक काढलं आहे. यामध्ये केंद्राने देशातील सगळ्या रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
या पत्रकात म्हटलं आहे की, "देशात कोरोनाची महामारा ज्यावेगाने पसरत आहे, ती पाहता आम्ही केंद्र सरकारकडे मागणी करतो की देशातील सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमधील ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करावा. सोबतच सरकारने तातडीने देशातील लोकांचे मोफत लसीकरण करावे. याशिवाय अर्थसंकल्पात लसीकरणासाठी तरतूद केलेल्या 35 हजार कोटींचा वापर मोहिमेसाठी करावा."
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक आपत्तीसंदर्भात नागरिकांना वेळीच योग्य माहिती द्या; मुख्यमंत्र्यांच्या सूचना
अवघ्या काही दिवसांवरच पावसाळा ऋतू येऊन ठेपला आहे. त्यामुळं येऊ घातलेल्या पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी समन्वय राखत अतिशय काळजीपूर्वक काम करावे, सोबतच नागरिकांना वेळीच सुचना मिळतील याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. रविवारी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा पावसाळयापूर्वीच्या तयारीचा आढावा दूरदृश्य प्रणालीद्वारे घेताना ते बोलत होते.
सदर आढावा बैठकीला कोकणातील जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, तटरक्षक दल, मस्त्यव्यवसाय विकास, हवामान विभाग, नौदल यांनी बैठकीत आपापल्या तयारीची माहिती प्रशासनाला दिली. आपत्ती व्यवस्थापनासोबतच दरम्यानच्या काळात मासेमारी व्यावसायिक बोटींशी संपर्क ठेवत त्यांनाही सूचना पोहोचवण्यावर मुख्यमंत्र्यांनी भर दिला. वीज प्रतिरोधक यंत्रणा, जिल्ह्याचे नियंत्रण कक्ष देखील व्यवस्थित कार्यान्वित असावेत याबाबतची काळजी घ्यावी असे निर्देश त्यांनी दिले.
गांधी विचारक सुमनताई बंग यांचे निधन
नागपुरात पोलिसांवर अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांचा हल्ला
नागपूरात पोलिसांवर अवैध दारू विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांचा हल्ला, अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत 'टोली' या वस्तीत अवैध दारु विरोधात कारवाई करायला गेलेल्या पोलिस पथकावर अवैध दारु विक्रेते आणि त्यांच्या समर्थकांनी हल्ला केला, या हल्ल्यात नागपुरातील अजनी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षकाची गाडी फोडण्यात आली आहे.
राज्यात आज 59,500 रुग्णांना डिस्चार्ज, 48,621 नव्या रुग्णांची नोंद
मोठा दिलासा... राज्यात आज 59,500 रुग्णांना डिस्चार्ज, 48,621 नव्या रुग्णांची नोंद
साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन
साताऱ्यात उद्यापासून कडक लॉकडाऊन,
औषधाची दुकाने वगळता सातारा जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ,
शेती अवजारे आणि इतर किराणा घरपोचसाठी परवानगी,
अनावश्यक बाहेर पडणाऱ्यांवर कडक कारवाई,
सातारा उपजिल्हाधिकारी यांचे आदेश,
डोंबिवलीतील विभा कंपनीच्या जागेत महापालिका उभारणार 580 बेड्सच कोविड रुग्णालय
डोंबिवलीतील विभा कंपनीच्या प्रशस्त जागेत कोविड रुग्णालय सुरू करण्याची परवानगी कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने उच्च न्यायालयाकडे मागितली होती. न्यायालयाने ती दिल्यामुळे रुग्णालय सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेत 580 बेडचे रुग्णालय सुरू करण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.