Breaking News LIVE : गोव्यात उद्यापासून लॉकडाउन नाही मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध
Breaking News LIVE Updates, 2 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
लॉकडाऊननंतरही राज्यात रुग्णसंख्या कमी होईना; शनिवारी तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची भर
राज्यात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने वाढताना दिसत असून ग्रामीण भागात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. आज राज्यात तब्बल 63 हजार 282 नवीन रुग्णांचे निदान झाले. दिलासादायक म्हणजे आज 61 हजार 326 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहे. राज्यात आजपर्यंत एकूण 39,30,302 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) आता 84.24 % एवढे झाले आहे. तर राज्यात आज 802 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.49% एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 2,73,95,288 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 46,65,754 (17.03 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 40,43,899 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत तर 26,420 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सीबीएसई दहावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जारी, 20 जूनपर्यंत निकालाची शक्यता
BSE 10th Result : सीबीएसई दहावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जारी करण्यात आले आहेत. मूल्यपमान पूर्ण करून 20 जून पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रत्येक शाळेत रिझल्ट समिती नेमण्यात येईल. यामध्ये शाळेचे प्राचार्य आणि एकूण 7 शिक्षक असतील. 7 शिक्षकांमध्ये 5 शिक्षक हे शाळेतील तर 2 शिक्षक हे दुसऱ्या जवळच्या शाळेतील नेमण्यात येतील.
'सर्व पालिकांनी ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण व्हावे', मुख्यमंत्र्यांच्या पालिका आयुक्तांना सूचना
सौम्य लक्षणांच्या घरीच विलगीकरणातल्या रुग्णांना नेमके कधी रुग्णालयांत हलवावे जेणे करून वेळीच योग्य ते उपचार मिळून त्यांचे प्राण वाचू शकतील त्यासाठी एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करून ज्येष्ठ व निवृत्त डॉक्टर्सकडे रुग्णांच्या संपर्काची जबाबदारी द्यावी. येणाऱ्या तिसऱ्या संभाव्य लाटेत लहान मुलांमध्येही मोठ्या प्रमाणावर कोविड संसर्ग आढळण्याची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी बोलून दाखविली असून प्रशासनाने त्याबाबतही आगाऊ नियोजन करून ठेवावे. प्रत्येक पालिका क्षेत्रात येणाऱ्या काही दिवसांत ऑक्सिजन सुविधा उपलब्ध झालीच पाहिजे आणि यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची गरज पडली नाही पाहिजे अशा विविध महत्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या.
गोव्यात उद्यापासून लॉकडाउन नाही मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध
गोव्यात उद्यापासून लॉकडाउन नाही मात्र कोविडचा फैलाव रोखण्यासाठी असणार कडक निर्बंध,सकाळी 7 पासून सायंकाळी 7 वाजे पर्यंत सुरु असणार जीवनावश्यक वस्तुंची दुकाने,लॉकडाउनमध्ये बंद करण्यात आलेले व्यवसाय 3 मे पासून 10 मे पर्यंत असणार बंद,निर्बंध न पाळणाऱ्यांवर होणार कडक कारवाई,144 कलम असणार कायम: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा
आज राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान, 51,356 रुग्ण बरे होऊन घरी
Breaking News LIVE : आज राज्यात 56,647 नवीन रुग्णांचे निदान, 51,356 रुग्ण बरे होऊन घरी https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-2nd-may-2021-984747
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत बाजी मारणाल्याबद्दल तृणमूलच्या ममता बॅनर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. नुकतेच देशातील या बहुप्रतिक्षित निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.
पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये मतमोजणी प्रक्रिया धीम्या गतीने सुरु नाही
पाच राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये मतमोजणी प्रक्रिया धीम्या गतीने सुरु नाही. बहुतांश भागांमध्ये सर्व्हर डाऊन झाल्यामुळं या तांत्रिक कारणास्तव काही अडचणी उदभल्या, निवडणूक आयोगाची माहिती
मुंबई- गोवा हायवेवर कंटेनर ट्रेलरला आग
मुंबई - गोवा हायवेवर कंटेनर ट्रेलरला आग. पोलादपुर तालुक्याततील चांढवे गावाजवळ कंटेनर ट्रेलरला आग. रत्नागिरीच्या दिशेने निघालेल्या कंटेनर ट्रेलरने अचानक घेतला पेट. मुंबई - गोवा हायवेवरील वाहतुक काही काळ विस्कळीत