एक्स्प्लोर

Maharashtra Headlines : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी; वाचा एका क्लिकवर दुपारच्या बातम्या

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील... 

Uday Samant : रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं, अन् आता विरोध, हा दुटप्पीपणा; उदय सामंत यांचे टीकास्त्र 

महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे. वाचा सविस्तर

Ratnagiri Barsu Refinery Protest: बारसूची जागा रिफायनरीसाठी मुख्यमंत्री असताना ठाकरेंनीच सुचवलेली; पत्र सोशल मीडियावर व्हायरल

रिफायनरीसाठी बारसू हे ठिकाण उद्धव ठाकरेंनीच सुचवलं होतं. ठाकरे मुख्यमंत्री (Uddhav Thackeray) असताना त्यांनीच रिफायनरीच्या समर्थनार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं होतं. 12 जानेवारी 2022 रोजीचं हे पत्र आहे. बारसूमध्ये 13 हजार एकर जमीन राज्य सरकारकडून (State Government) उपलब्ध करून देण्याची तयारीही पत्रातून उद्धव ठाकरेंनी दर्शवली होती. तसेच, यातील बहुतांश जमीन ओसाड असल्यामुळे पुनर्वसनाचा प्रश्नच येणार नाही, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं होतं. राज्य सरकारच्या या पत्रानंतरच केंद्र सरकारनं बारसूमध्ये रिफायनरी उभारण्यास परवानगी दिली होती. सध्या हे पत्र सध्या सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. वाचा सविस्तर 

Rajaram Sakhar Karkhana Election Result LIVE: पहिला विजयी गुलाल अप्पा महाडिकांना! संस्था गटातून माजी आमदार महादेवराव महाडिकांची सरशी

अवघ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांना विजयी गुलाल लागला आहे. महादेवराव महाडिक यांना 83 मते मिळाली. विरोधी उमेदवार सचिन पाटील यांना 44 मतं मिळाली. राजाराम कारखाना निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी तगडे आव्हान निर्माण करूनही महादेवराव महाडिकांची सरशी झाली आहे. कारखानाच्या नऊपैकी सहा गटातून महाडिक गटाने बाजी मारली आहे. सरासरी अडीच हजार मतांनी उमेदवार आघाडीवर आहेत. वाचा सविस्तर

Pune-Latur-Pune Railway : पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-लातूर-पुणे रेल्वे सुरु होणार, प्रवाशांना मोठा दिलासा

 पुणे-लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना गिफ्ट दिलं आहे. पुणे रेल्वे विभागाकडून पुणे-लातूर-पुणे अशी नवीन रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. लातूर पुणे या मार्गावरील रेल्वेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. याच मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील मोठी आहे. हे लक्षात घेत पुणे रेल्वे विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठीचा प्रस्ताव रेल्वे मुख्यालयास पाठवण्यात आला आहे. वाचा सविस्तर 

Sanjay Raut Complaint to CBI: भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात संजय राऊतांची CBI कडे तक्रार; 500 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सीबीआयकडे तक्रार दाखल केली आहे. भीमा पाटस साखर कारखान्याविरोधात (Bhima Patas Sugar Factory) राऊतांनी सीबीआयकडे (CBI) तक्रार केल्याची माहिती मिळत आहे. गृहमंत्र्यांनी दुर्लक्ष केल्यानं आपण सीबीआयकडे तक्रार केल्याची माहिती संजय राऊतांनी दिली आहे. तसेच, या कारखान्यात तब्बल 500 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. दरम्यान, भीमा पाटस कारखाना भाजप (BJP) आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या मालकीचा आहे. वाचा सविस्तर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 19 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 8 AM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सJ. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP MajhaTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 19 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
मोठी बातमी: लातूर पोलिसांचं पथक बीडमध्ये धडकलं, राजस्थानी मल्टिस्टेटच्या कार्यालयाला ठोकलं सील
Chandu Champion Trailer : 'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
'चंदू चॅम्पियन'चा शानदार ट्रेलर रिलीज! कार्तिक आर्यनच्या दमदार अभिनयाचं होतंय कौतुक
Mumbai Weather: मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
मुंबईत प्रचंड उकाडा, घामाच्या धारा, तापमान 36 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडणार, हवामान खात्याचा महत्त्वाचा अलर्ट
Govinda : गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
गोविंदाच्या लग्नाचे अन् डेटिंगचे कधीही न पाहिलेले फोटो; सुनीताच्या सौंदर्यावर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
RCB vs CSK : पाच पराभवानंतर आरसीबीचा विजयाचा षटकार, बंगळुरुच्या प्लेऑफमधील एंट्रीचं जंगी सेलिब्रेशन, पाहा व्हिडीओ
आरसीबीकडून होम ग्राऊंडवर चेन्नईचा हिशोब पूर्ण, प्लेऑफमध्ये एंट्री, बंगळुरुच्या चाहत्यांची दिवाळी
Horoscope Today 19 May 2024 : आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
आजचा रविवार खास! मेष, कन्या, मीनसह 'या' राशींचा दिवस भाग्याचा; वाचा आजचे राशीभविष्य
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
Embed widget