(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Uday Samant : रिफायनरीसाठी उद्धव ठाकरेंनी पत्र दिलं, अन् आता विरोध, हा दुटप्पीपणा; उदय सामंत यांचे टीकास्त्र
Nashik Uday Samant : महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते.
Nashik Uday Samant : महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांनी बारसू रिफायनरीसाठी पत्र दिले होते. आज अचानक महाविकास आघाडीतील नेते विरोध करु लागले आहेत, हा दुटप्पीपणा आहे. स्थानिकांचा नाही, काही लोकांचा विरोध आहे. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा, हा दुटप्पीपणा असल्याचा घणाघात उदय सामंत (Uday Samant) यांनी केला आहे.
आज मंत्री उदय सामंत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर असून दुसरीकडे बारसू रिफायनरीच्या (Barsu Refinery) सर्वेक्षणाविरोधात कालपासून आंदोलन (Protest) सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आज सकाळी सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, "सद्यस्थितीत बारसू रिफायनरीबाबत सगळे गैरसमज पसरवले जात आहेत. सकाळपासून सगळी परिस्थिती बघत असून प्रसार माध्यमांबाबत आम्हाला आदर आहे. फक्त एका व्यक्तीबाबत हा प्रश्न आला आहे, ते उलट सुलट प्रश्न विचारत असल्याने झालं असावं, सामंत म्हणालेत. ते पुढे म्हणाले की, बारसू रिफायनरी हा क्रांतिकारी प्रकल्प असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. काही लोकांचे मनसुबे धुळीस मिळाल्यामुळे जालियनवाला बाग होईल, असं म्हटलं जातंय."
उदय सामंत म्हणाले की, नानार रद्द (Nanar Project) करण्यात आम्ही देखील होतो. बारसूमध्ये रिफायनरी व्हावी, हे पत्र उद्धव ठाकरे यांनी दिले होते. साडे नऊचा इव्हेंट करणारे म्हणतात की रिफायनरी होणार नाही. एकीकडे पत्र द्यायचं आणि दुसरीकडे विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. आंदोलन करुनच मी देखील इथपर्यंत पोहोचलो आहे. स्थानिकांचा नाही, मात्र काही लोकांचा विरोध आहे. काल देखील याबाबत बैठक झाली. ज्याला मला भेटायचं आहे, त्यांना मी भेटेन. उद्योगमंत्र्यांना जाळून टाकू असं जे म्हणत आहेत, त्यांना तुम्ही काय म्हणाल? असा सवालही सामंत यांनी उपस्थित केला आहे. जसे संघर्षवाले आहेत, तसेच समर्थक देखील आहेत. चुकत असेल तर आम्हाला सूचित करा, विरोधकांना कळलं की आंदोलन होत नाही, म्हणून हे सुरु आहे. प्रसारमाध्यमांनी देखील काही ठिकाणी आम्हाला सहकार्य करणं महत्वाचं असल्याचे आवाहन यावेळी उदय सामंत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री नाराज अस कोण म्हणतं?
दरम्यान सद्यस्थितीत महाराष्ट्रातील राजकरण मुख्यमंत्री पदावरुन ढवळून निघाले आहे. मुख्यंमत्री एकनाथ शिंदे सध्या सुट्टीवर आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मुख्यमंत्री नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. यावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्री नाराज असं कोण म्हणतं? गावच्या जत्रेत जात असतील आणि नाराजीची चर्चा असेल तर जे चर्चा करत आहेत. त्यांचा जत्रेतच नागरी सत्कार करावा लागेल, असेही उदय सामंत यांनी इशारा देत म्हटले आहे. तसेच याच मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पुढील निवडणूक लढवली जाणार, हे मुख्यमंत्री दीड वर्ष कायम राहणार असल्याचे ते म्हणाले.