एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
एसटीच्या प्रवाशांना आता फक्त 30 रुपयांत चहा-नाश्ता
![एसटीच्या प्रवाशांना आता फक्त 30 रुपयांत चहा-नाश्ता Breakfast In Only 30 Rupees St Corporations New Scheme एसटीच्या प्रवाशांना आता फक्त 30 रुपयांत चहा-नाश्ता](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/16201810/bus.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबईः खाजगी हॉटेलचालकांकडून प्रवाशांची होणारी लूट रोखण्यासाठी एसटी महामंडळाने '30 रुपयांत चहा-नाश्ता' ही योजना आणली आहे. लांबच्या मार्गावरील सध्या 22 अधिकृत थांब्यांवर ही सेवा सुरु केली आहे.
'30 रुपयांत चहा-नाश्ता' ही योजना ऑगस्ट महिन्यातच सुरु करण्यात आली. मात्र प्रवाशांना याची माहिती नसल्याने दिवाळीच्या मुहूर्तावर प्रशासनाने वाहकांच्या हस्ते पत्रक देऊन प्रवाशांना या योजनेची माहिती देणं सुरु केलं आहे.
काय आहे '30 रुपयांत चहा-नाष्टा' योजना?
लांब पल्ल्याच्या गाड्या आगारांशिवाय खाजगी हॉटेलवर थांबतात. मात्र हॉटेलकडून प्रवाशांची सर्रास लूट केली जाते. याच्या अनेक तक्रारी एसटी महामंडळाला मिळाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाने एक अहवाल तयार करत ही योजना आणली.
एसटीच्या प्रवाशांना शिरा, पोहे, उपमा, वडापाव, इडली, मेदूवडा, यांपैकी एक पदार्थ आणि एक कप चहा 30 रुपयांत मिळणार आहे. सध्या केवळ 22 अधिकृत थांब्यांवर ही योजना सुरु करण्यात आली आहे. लवकरच राज्यभरातील 100 थांब्यांवर ही योजना सुरु करण्यात येणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)