एक्स्प्लोर
भारतमातेच्या वीरांची शौर्यगाथा आता कॉमिक्सच्या रुपात !

नांदेड : कोणत्या सैनिकाने आपल्या देशाची सुरक्षा अबाधित राहावी, यासाठी हौतात्म्य पत्करले, कुणी काय त्याग केला हे कधीच जगासमोर फारसे येत नाही. अशा खऱ्याखुऱ्या हिरोंची कहाणी देशासमोर यावी, यासाठी आता सीआरपीएफने प्रयत्न केला आहे.
शाळा संपल्यावर अधिकच वेळ बसून ही मुलं कॉमिक्स वाचत आहेत. पण हे कॉमिक्स आहेत आपल्या देशातील खऱ्या हिरोंचे. होय, असे हिरो ज्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. शूरवीर प्रकाश, जाँबाज आलिंगो, सरदार पोस्ट : एक शौर्यगाथा, अशी या कॉमिक्सची नावं आहेत. या कॉमिक्समध्ये छापण्यात आलेल्या सर्व घटना सत्यकथा आहेत. आजवर आपली मुलं केवळ स्पायडर मॅन, कृष्णा, इंद्रजाल अशी काल्पनिक कॉमिक्स वाचत होती. पण मुलांना आपल्या देशाप्रती आपल्या जवानांप्रती आदर निर्माण व्हावा, त्यांच्या त्यागाची माहिती व्हावी, यासाठी सीआरपीएफने हा प्रयत्न केला आहे. आता ही कॉमिक्स वाचून मुलांना प्रेरणा मिळत असल्याचं ही मुलं सांगतात. 1980 साली आपल्या देशात प्रथम कॉमिक्सला सुरुवात झाली. टाईम्स समूहाने इंद्रजाल नावाने पहिले कॉमिक्स आपल्या हाती दिले. भारतात वर्षाकाठी 5 लाखांपेक्षा जास्त कॉमिक्सची विक्री होते. विशेष म्हणजे या कॉमिक्समधील पात्र हे लहान मुलांच्या मनावर राज्य करतात. नेमकी हीच बाब हेरून सीआरपीएफने वीर जवानांची शौर्यगाथा कॉमिक्स रूपाने प्रकाशित केली आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी आपली सुरक्षा दल कायम खडा पहारा देत असतात. यामुळेच आपण आपल्या घरात परिसरात सुरक्षितपणे वावरू शकतो. मातृभूमीचे रक्षण करताना अनेकदा सुरक्षा दलातील अनेक वीर जवान धारातीर्थ पडतात. पण त्यांची शौर्यगाथा आपल्याला माहित नसते. आपण केवळ पडद्यावर दिसणारे हिरो पाहून त्यांच्या प्रेमात पडतो आणि त्यांचे चाहते होतो. पण देशाचे खरे हिरो कायम उपेक्षित राहतात. आता सीआरपीएफने केलेला हा प्रयत्न मुलांमध्ये देशप्रेम निर्माण करणारा तर आहेच, पण खऱ्या वीर जवानांची शौर्यगाथा कायम स्मरणात ठेवणारा आहे.
शाळा संपल्यावर अधिकच वेळ बसून ही मुलं कॉमिक्स वाचत आहेत. पण हे कॉमिक्स आहेत आपल्या देशातील खऱ्या हिरोंचे. होय, असे हिरो ज्यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले. शूरवीर प्रकाश, जाँबाज आलिंगो, सरदार पोस्ट : एक शौर्यगाथा, अशी या कॉमिक्सची नावं आहेत. या कॉमिक्समध्ये छापण्यात आलेल्या सर्व घटना सत्यकथा आहेत. आजवर आपली मुलं केवळ स्पायडर मॅन, कृष्णा, इंद्रजाल अशी काल्पनिक कॉमिक्स वाचत होती. पण मुलांना आपल्या देशाप्रती आपल्या जवानांप्रती आदर निर्माण व्हावा, त्यांच्या त्यागाची माहिती व्हावी, यासाठी सीआरपीएफने हा प्रयत्न केला आहे. आता ही कॉमिक्स वाचून मुलांना प्रेरणा मिळत असल्याचं ही मुलं सांगतात. 1980 साली आपल्या देशात प्रथम कॉमिक्सला सुरुवात झाली. टाईम्स समूहाने इंद्रजाल नावाने पहिले कॉमिक्स आपल्या हाती दिले. भारतात वर्षाकाठी 5 लाखांपेक्षा जास्त कॉमिक्सची विक्री होते. विशेष म्हणजे या कॉमिक्समधील पात्र हे लहान मुलांच्या मनावर राज्य करतात. नेमकी हीच बाब हेरून सीआरपीएफने वीर जवानांची शौर्यगाथा कॉमिक्स रूपाने प्रकाशित केली आहे. भारतमातेच्या रक्षणासाठी आपली सुरक्षा दल कायम खडा पहारा देत असतात. यामुळेच आपण आपल्या घरात परिसरात सुरक्षितपणे वावरू शकतो. मातृभूमीचे रक्षण करताना अनेकदा सुरक्षा दलातील अनेक वीर जवान धारातीर्थ पडतात. पण त्यांची शौर्यगाथा आपल्याला माहित नसते. आपण केवळ पडद्यावर दिसणारे हिरो पाहून त्यांच्या प्रेमात पडतो आणि त्यांचे चाहते होतो. पण देशाचे खरे हिरो कायम उपेक्षित राहतात. आता सीआरपीएफने केलेला हा प्रयत्न मुलांमध्ये देशप्रेम निर्माण करणारा तर आहेच, पण खऱ्या वीर जवानांची शौर्यगाथा कायम स्मरणात ठेवणारा आहे. आणखी वाचा























