एक्स्प्लोर
मुख्यमंत्र्यासोबत फोटो काढण्यासाठी चिमुकल्याने मुंडेंनाच फोटोग्राफर बनवलं!

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल मुलांना किती आकर्षण आहे, याचा प्रत्यय आज नागपुरात आला. कारण एका लहान मुलानं मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी थेट धनंजय मुंडेंच्या हाती मोबाईल दिला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुलगी पायल हिचा विवाहसोहळा आज नागपूरमध्ये होता. त्यावेळी हा गंमतीदार प्रसंग पाहावयास मिळाला. काय घडलं? ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलीचा विवाहसोहळा आज पार पडला. यात एक गंमतीदार प्रसंग घडला. एका लहान मुलानं मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढण्यासाठी थेट धनंजय मुंडेंच्या हाती मोबाईल दिला. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंनीही कुठलाही आढावेढा न घेता मोबाईल हाती घेऊन मुलाचा मुख्यमंत्र्यांसोबत फोटो काढला. ऊर्जामंत्री चंद्रशेखऱ बावनकुळे यांची मुलगी पायल हिचा विवाह सोहळा आज नागपूरमध्ये होता. त्यावेळी हा प्रसंग घडला. पायल हिचा विवाह लोकेश आष्टणकर यांच्याशी पार पडला. हे लग्न नागपुरजवळील कोराडी येथील देवीच्या मंदिराच्या प्रांगणात झाले. लग्नासाठी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित होते. पाहा व्हिडीओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
विश्व
व्यापार-उद्योग
नागपूर























