एक्स्प्लोर
गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा डोळा निकामी
गेम खेळता खेळता मोबाईल गरम झाला आणि मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी मोबाईलचा एक तुकडा मुलाच्या डोळ्यात घुसल्याने त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.

कोल्हापूर : कोल्हापुरात मोबाईलवर गेम खेळताना अचानक झालेल्या स्फोटामुळे 16 वर्षीय मुलाला आपला डोळा गमवावा लागला आहे. अमोल दत्तात्रय पाटील असं जखमी मुलाचं नाव असून तो मुळचा कागल तालुक्यातील उंदरवाडीचा रहिवासी आहे.
आई-वडील शेतात गेल्याने अमोल घरी एकटाच होता. गेम खेळता खेळता मोबाईल गरम झाला आणि मोबाईलचा अचानक स्फोट झाला. त्यावेळी मोबाईलचा एक तुकडा अमोलच्या डोळ्यात घुसला आणि त्याच्या डोळ्याला गंभीर इजा झाली.
जखमी अमोलला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोबाईलचा तुकडा लागल्याने अमोलचा डोळा निकामी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याआधी देखील मोबाईलचा स्फोट होऊन अनेक जण जखमी झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांच्या हातात मोबाईल देण्याआधी विचार केला पाहिजे.आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement


















