एक्स्प्लोर
अॅम्ब्युलन्स देण्यास रुग्णालयाचा नकार, मुलाचा उपचाराअभावी मृत्यू
अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने दिलखुशकुमारला मुंबईत हलवता आले नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी डॉक्टरांवर केला आहे.

पालघर : रुग्णालयाने अॅम्ब्युलन्स देण्यास नकार दिल्याने 10 वर्षीय मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची घटना पालघर जिल्ह्यात घडली. दिलखुशकुमार दिलीपकुमार मंडल असे या मुलाचे नाव आहे. दिलखुशकुमार हा पालघरमधील बिडको येथील रहिवशी होता. त्याला कुत्रा चावल्याने गंभीर दुखापत झाली होती. दिलखुशकुमारला उपचारासाठी पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिलखुशकुमारला अधिक उपचारांची गरज असल्याने आणि त्याची तब्येत बिघडल्याने मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. धक्कादायक म्हणजे, पालघर ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी मुंबईत उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला, मात्र त्याला नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स देण्यास नकार दिला. कुत्रा चावण्यासारख्या घटनेसाठी अॅम्ब्युलन्स दिली जात नसल्याचे कारण देण्यात आले. रुग्णाच्या नातेवाईकांनी असा दावा केला आहे. अॅम्ब्युलन्स न मिळाल्याने दिलखुशकुमारला मुंबईत हलवता आले नाही आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा गंभीर आरोप नातेवाईकांनी डॉक्टरांवर केला आहे. 108 च्या अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यानी दिली. दोषींची तातडीने चौकशी करुन निलंबन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर
राजकारण
























