एक्स्प्लोर
Advertisement
साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक... कर्ज फेडणारं गाव!
सातारा : गावची शेती ओलिताखाली आणण्यासाठी काढलेलं कर्ज वेळेत फेडणारं गाव म्हणून साताऱ्यातील बोरगाव बुद्रुक या गावाने ओळख निर्माण केली आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना या गावाने एका वेगळ्या प्रकारे आदर्श घालून दिला आहे.
सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील दुर्गम पट्यातील बोरगाव बुद्रुक हे गाव. पावसाळ्याव्यतरिक्त शेतीला पाणी नाही. चांगला पाऊस झाला तर भात शेती होते. अन्यथा आकाशाकडे डोळे लावून बसण्याला पर्याय नाही. अनेक वेळा तर भात शेती केल्यावर पावसाने हुलकावणी दिली की, लावलेली भात शेती जळून जायची.
तीस वर्षांपूर्वी येथील ग्रामस्थांनी स्वत:च्या बळावर शेती ओलिताखाली आणण्याचं ठरवलं आणि 1989 साली गावात लोक वर्गणी काढायला सुरुवात केली. पाहता पाहता गावाने सहकारी भू-विकास जलसिंचन संस्था उभी करुन गावात पाणी आण्याचा निर्णय घेतला आणि लोक वर्गणीतून 15 लाख रुपये जमा केले.
यासाठी गावातील प्रत्येक शेतकऱ्याने कर्ज काढले. दोन टप्प्यात पाणी उचलून गावात पाणी आणले. नुसते गावातच पाणी आणले नाही तर गावातल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर पाईपलाईन करुन पाणी नेले आणि गावतली तब्बल 200 एकर जमीन ओलिताखाली आली.
बारा महिने शेतीला पाणी म्हटल्यावर गावातला प्रत्तेक व्यक्ती प्रत्येक पाहिजे ते पीक घेऊ लागला. गाव सुजलाम् सुफलाम् होत गेलं. कर्ज काढून शेती करायला सुरूवात केली आणि आणि प्रत्येक शेतकऱ्याने कर्ज फेडायला सुरुवात केली. सुरुवातीला पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज फेडलंच फेडले. पण नंतर शेती करण्यासाठी लागणारं प्रत्येकवर्षी कर्ज काढणं आणि कर्जाचे हप्ते वेळेत फेडत नेले.
पाणी साठवण्यासाठी तयार केलेली पन्नास फुटाची विहीर डिसेंबरमध्ये कोसळली. गावावर पुन्हा संकट कोसळलं. गावानं पुन्हा उभं राहण्याचा निश्चय केला आणि पुन्हा लोक वर्गणी गोळा केली. 40 लाख रुपये गोळा केले आणि धरणातून थेट पाणी गावात आणलं. या प्रकल्पाच उद्घाटन नुकतंच जेस्ट अभिनेते सुरेश पाल आणि सिया पाटिल यांच्या हस्ते झाले. गावच्या एकीमुळे ही पाहुणे मंडळी भारावून गेली.
काही ग्रामस्थांनी तर एकत्र येऊन आपली जमीन फळबागांसाठी राखून ठेवली. त्यासाठी 15 शेतकरी एकत्र आले आणि तब्बल 30 एकराच्या जमिनीत त्यांनी दीड हजार कलमी आंब्यांची झाडे लावली. या संपूर्ण क्षेत्राला त्यांनी कंपाऊंड केले आहे. दोन वर्षांपूर्वी लावलेली झाडे सध्या चांगल्या पद्धतीन मोठी झाली आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement