एक्स्प्लोर

Maharashtra Election 2024 : विधानसभेसाठी भाजपची नवी रणनीती; राज्यभरात महाजनसंपर्क अभियान, दिग्गज नेत्यांचाही सहभाग 

Election 2024: भाजपने राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरवले आहे. उद्या, 6 ऑक्टोबरला नागपुरातून या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. त्या पाठोपाठ राज्यभरात हे अभियान राबवले जाणार आहे.   

Maharashtra Politics नागपूर: लोकसभा निवडणुकीत राज्यात आणि विशेषत:विदर्भात जबर दणका बसल्यानंतर आता भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी  (State Legislative Assembly Election 2024) चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी भाजपचे  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येऊन गेले आहेत. दरम्यान, अमित शाह (Amit Shah) हे  नागपूर येथे देखील येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी भाजप नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी अमित शाह यांनी विधानसभा निवडणुकीत आपले प्रमुख उद्दिष्ट  सांगत भाजपच्या (BJP) सर्व स्थरातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्ण ताकदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने आता भाजपचे सर्व नेते नवनवीन रणनीती आखत विधानसभेसाठीची तयारी करताना दिसत आहे. दरम्यान, आता भाजपने राज्यात महाजनसंपर्क अभियान राबविण्याचे ठरवले आहे. उद्या म्हणजेच 6 ऑक्टोबरला नागपुरातून या महाजनसंपर्क अभियानाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर नागपूर पाठोपाठ  राज्यभरात हा महाजनसंपर्क अभियान राबवला जाणार आहे.   

दिग्गज नेत्यांचाही सहभाग 

विधानसभेसाठी भाजप महाजनसंपर्क अभियान  राबवणार आहे. या माध्यमातून एकाच वेळी शहरातील सर्व कार्यकर्ते घराबाहेर पडून घरोघरी जाऊन संपर्क साधतील. 6 तारखेला सकाळी 8 ते दुपारी 12 दरम्यान हे महाजनसंपर्क अभियान होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र, राज्य पातळीवरील वरिष्ठ मंत्रीही यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांसोबत गृहसंपर्क साधतील. यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील यात सहभागी होणार आहेत. नागपूर नंतर विधानसभा निवडणूक घोषित होण्याअगोदर तसेच नंतर प्रचारादरम्यान राज्यात इतर ठिकाणीही अशी मोहीम राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून भाजपचे कार्य जनतेपर्यंत, त्यांच्या घरापर्यंत पोहचवणार आहे. राज्यात नागपुरातून या महाजनसंपर्क मोहिमेची उद्या सुरुवात होणार असून एकाच वेळी शहरातील सर्व सहा मतदारसंघातील 2 हजार 158 बूथच्या भागात भाजप कार्यकर्ते घरोघरी जाऊन संपर्क साधतील, अशी माहिती पुढे आली आहे.

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून 'या' नावांची चर्चा

मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून भाजपने हलबा नेते दिपराज पार्डीकर आणि माजी महापौर प्रवीण दटके यांच्या नावाची चाचपणी केली आहे. मध्य नागपूर मतदारसंघात 90 हजारापेक्षा जास्त हलबा समाजाचे मतदार आहेत. त्यामुळं भाजप हलबा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जातेय. विजयाच्या निकषावर भाजप उमेदवार देणार असल्याची माहिती मिळत आहे. 

 हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM : 21 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सNarendra Modi Speech Marathi Sahitya Sammelan : RSS मुळे माझा मराठीशी संबंध,पवारांसमोर UNCUT भाषणSharad Pawar Speech Marathi Sahitya Sammelan Delhi : आखिल भारतीय साहित्य संमेलनात शरद पवारांचे भाषणDr.Tara Bhawalkar speech Delhi:कोण पुरोगामी, कोण फुरोगामी, मोदी-पवारांसमोर तारा भवाळकरांनी सुनावलं!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
काश्मीरच्या शमिमानं मोदींसमोर गायलं पसायदान अन् गर्जा महाराष्ट्र; स्टँडींग ओव्हेशन अन् टाळ्यांचा कडकडाट
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
12 वीच्या परीक्षा वर्गात राष्ट्रवादीच्या आमदार महोदयांचे फोटोशूट; इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटला बंदी नाही का?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 फेब्रुवारी 2025 | शुक्रवार 
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
गणोजी आणि कान्होजी शिर्केंकडून छावा सिनेमात संभाजीराजेंचा घात, गद्दारीचा शिक्का, राजेशिर्के घराण्याकडून दिग्दर्शकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Manoj Jarange Patil : धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
धनंजय मुंडेंना संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करा, मनोज जरांगे मस्साजोगमध्ये चार्जशीटबद्दल स्पष्टच बोलले
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
प्रेमप्रकरणातून हत्या, नातेवाईकांनी आरोपीच्या घरासमोरच मृतदेह जाळला; काळापाणी गावातील शॉकिंग घटना
Vidarbha vs Kerala Final 2025 : रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
रहाणे, सूर्या, शिवम दुबे सगळे स्टार फेल! रणजी ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मुंबईचा पराभव, फायनलमध्ये विदर्भ Vs केरळ मुकाबला
Embed widget