(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra wagh : अनिल देशमुखांचा काळा बुरखा आज टराटरा फाटला; भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षाचा घणाघात
Chitra wagh On Anil Deshmukh : सचिन वाझेंनी अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे.
मुंबई : सचिन वाझेंनी (Sachin Vaze) माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर (Anil Deshmukh) केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. अशी टीका भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra wagh) यांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्यांनी दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी आणि यातील दोषींवर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली आहे.
आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का?
निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंनी (Sachin Vaze) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख हे पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिल्याचेही वाझेंनी म्हटले आहे. यामुळे महाष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच आता भाजपच्या नेत्यांनीही आता याच मुद्यावरून विरोधकांवर निशाणा साधला आहे. निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, हे जनता विसरलेली नाही. सचिन वाझें विषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझें म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का? याची आम्ही वाट पहात असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या.
काय म्हणाले सचिन वाझे?
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सचिन वाझेंनी म्हटलं की, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. सीबीआयकडे देखील त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे. सुनावणी त्यांच्या विरोधात गेली आहे. देवेंद्र फडणवीसांना देखील या संदर्भात मी पत्र लिहिले आहे. मी नार्को टेस्टसाठी कधीही तयार आहे. मी एक पत्र लिहिले आहे. त्यामध्ये जयंत पाटील यांचे नाव आहे, असे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या