एक्स्प्लोर
भाजप-शिवसेनेचा हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक : शरद पवार
केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

कोल्हापूर : केवळ हिंदुत्वाचा विचार देशासाठी घातक असल्याचं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. देशात सर्व धर्मियांचा सन्मान होणं गरजेचं असल्याचे सांगत पवारांनी शिवसेना आणि भाजपवर टीका केली. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शरद पवार कोल्हापुरात आले होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरातील आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक घेतली. यावेळी पवार बोलत होते. या बैठकीला काँग्रेसचे सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, हसन मुश्रीफ, ऋतुराज पाटील आणि आघाडीचे सर्व उमेदवार उपस्थित होते. पवार म्हणाले की, भाजप-शिवसेनेच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचे सांगितले. देशात केवळ हिंदुत्वाचा विचार पसरवणे हे देशासाठी घातक आहे. या देशात सर्व धर्मियांचा सन्मान राखायला हवा. या बैठकीवेळी पवारांनी महाआघाडीच्या नेत्यांना एकदिलानं काम करण्याचा सल्ला दिला. एकेकाळी आघाडीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात आघाडीला मोठं खिंडार पडलं आहे. त्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीत नेते आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी शरद पवार या भागात विशेष लक्ष देत आहेत. पवार म्हणाले की, काही जण नाराज असतील, परंतु आता नाराजी बाजूला ठेऊन लढायला उभ रहायचं आहे. नाराजी बाजूला ठेऊन कामाला लागा. शाहू नगरीतून वेगळ्या विचाराच्या शक्ती मोठ्या होतात, याचा धक्का बसतो. इथल्या विचारांशी ते सुसंगत नाही, त्यामध्ये आता बदल करायचा आहे. प्रत्येक उमेदवार आपला समजून प्रचार करा.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
नागपूर
नाशिक
सोलापूर






















