एक्स्प्लोर

चार-चार वेळा मुख्यमंत्री होऊनही प्रकल्प आणले नाहीत, ते आज टीका करतायत; नारायण राणे यांचा शरद पवार यांच्यावर हल्लाबोल

Narayan Rane : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

मुंबई: शरद पवार हे महान नेते आहेत, चार-चार वेळा मुख्यमंत्री होऊनही त्यांना प्रकल्प आणता आला नाही, तेच आज टीका करत आहेत असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. आता टीका करण्यापेक्षा विधायक कामांसाठी सहकार्य करावं असाही टोला त्यांनी लगावला. फॉक्सकॉन वेदांता वादावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, हे सगळे महान नेते आहेत, चार चार वेळा मुख्यमंत्री झालेली आहेत, अनुभवी आहेत. ते जे प्रकल्प आणू शकले नाहीत त्यांच्या अपयशाबद्दल न बोलता आज टीका करत आहेत. आता टीका करण्यापेक्षा विधायक कामासाठी सहकार्य करावे एवढेच तुमच्या मार्फत मला त्यांना सांगायचे आहे.

उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पवाल्यांना छळलं 

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हा प्रकल्प गुजरातला जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कारणीभूत ठरवले. ते म्हणाले की, ज्यांनी हा प्रकल्प घालवला तेच आज टीका करत आहेत. निदान जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. काय काय मागणी केली त्या प्रकल्पवाल्यांकडे. त्यांना छळले गेले आणि म्हणून ते महाराष्ट्रात आले नाहीत. याला कारण उद्धव ठाकरे आहेत. 

पर्यटन ट्रेन  सुरू व्हावी यासाठी प्रयत्नशील 

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले की, सध्या जी चर्चा सुरू आहे त्या प्रकल्पासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांसोबत भेटलो नाही. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्यामुळे देवगड-मालवण-वेंगुर्ला अशी एक पर्यटन ट्रेन सुरू व्हावी, त्याचा प्रायमरी प्रस्ताव हा कोकण रेल्वेने बनवला आहे. त्याला लागणारे पैसे राज्य सरकारने द्यावेतअसा प्रस्ताव मी तुमच्याकडे घेऊन येत आहे, हे सांगायला मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटलो. या पलीकडे माझा कोणताही विषय नव्हता. 

शरद पवारांची राज्य सरकावर टीका 

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये जाणं हे दुर्दैवी आहे, यावर त्यापेक्षा आणखी मोठा प्रकल्प आणण्याचं आमिष म्हणजे रडणाऱ्या मुलाची समजूत काढण्यासारखं आहे अशी टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. यावर आता चर्चा करण्यात काही अर्थ नसल्याचं सांगत पंतप्रधानांनी असा मोठा प्रकल्प दिला तर त्याचं स्वागतच आहे असंही ते म्हणाले. फॉक्सकॉन वादावर शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत राज्य सरकारवर टीका केली आहे. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget