BJP MLA Firing Live Updates : भाजपा आमदाराकडून शिवसेना नेत्यावर गोळीबार, 50 गुंठे जमिनीचा वाद
BJP MLA Firing Live Updates : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख यांच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

Background
BJP MLA Firing Live Updates : उल्हासनगरमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख यांच्या महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे.उल्हासनगरमध्ये (UlhasNagar Crime) भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाला आहे, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे गोळीबारप्रकरणी गणपत गायकवाडसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याची माहिती मिळतेय.
Video: भाजपच्या गणपत गायकवाडांचा शिंदे गटाच्या महेश गायकवाडांवर गोळीबार, CCTV फुटेज समोर
Ulhasnagar BJP MLA Firing CCTV Video : Ulhasnagar Firing Case : कल्याण पूर्व विभागातील माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे.
Ajit Pawar on Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधील गोळीबारानंतर अजित पवार संतापले
कल्याण : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar Crime) भाजप आमदार (BJP) गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) यांच्याकडून गोळीबार करण्यात आलाय. हिललाईन पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार झाला. त्यानंकर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे कायदा हातात घेणं चांगलं नाही, यासंदर्भात फडणवीसांशी चर्चा करणार, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी (Ajit Pawar) दिली आहे.























