(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत, त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना...', चंद्रकांत पाटलांचा आदित्य ठाकरेंना टोला
चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीवरुन आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे.
पुणे : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या तब्येतीवरुन आणि आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर टीका केली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आदित्य ठाकरेजींनी म्हटलंय की राज्यपालांना थेट भेटणे हे घटनेत बसत नाही. अरे बाबा, तुझे बाबा आम्हाला भेटत नाहीत त्यामुळेच आम्हाला राज्यपालांना भेटायला लागतंय, असं पाटील म्हणाले.
पाटील म्हणाले की, मागील अडीच वर्षांत उद्धव ठाकरे फक्त एकदा पुण्यात आले आणि एकदा फोनवरुन उपलब्ध झाले. उद्धव ठाकरे फोनवरही उपलब्ध होत नाहीत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला तरी फोनवर उपलब्ध होत नाहीत, असं ते म्हणाले.
पाटील म्हणाले की, पंतप्रधानपदासाठी उद्धव ठाकरेंनी त्यावेळेस संधी का सोडली. त्यावेळेस उदार झाले होते का. उद्धव ठाकरे, शरद पवार यांनाच नाही तर संजय राऊत यांनाही पंतप्रधान होण्यासाठी शुभेच्छा, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या कालच्या भाषणावर बोलताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचे कालचे भाषण म्हणजे थयथयाट होता. फ्रस्ट्रेशन व्यक्त करताना फोडेन, बाहेर पडेन, बघेन अशी भाषा वापरली जाते. उद्धव ठाकरेंचे कालचे भाषण हे दसरा मेळाव्यातील भाषणासारखेच होते. आपल्या पक्षाचा ऱ्हास होतोय, आपले चुकलेय या जाणिवेतून आलेले हे फ्रस्ट्रेशन आहे, असं पाटील म्हणाले.
नाना पटोले यांची शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी
नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना ते म्हणाले की, नाना पटोले यांना कॉंग्रेसने अंडर ऑबाझर्वेशन ठेवावे. शारीरिक आणि मानसिक तपासणी करावी. ज्याची पत्नी पळून जाते त्याला मोदी म्हणतात असे म्हणणार्या नाना पटोलेंना नक्की काय म्हणायचंय. सर्वोच्च नेत्यावर टीका करुन प्रसिद्धी मिळवावी हा नाना पटोलेंचा प्रयत्न आहे. नाना पटोले राजकारणाची पातळी किती खाली नेतायत याचा कॉंग्रेसने विचार करावा, असं ते म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर महत्वाच्या बातम्या
आज बाळासाहेब असते तर विरोधी पक्षांमधील कावकाव, चिवचिव थंड पडली असती : संजय राऊत
भाजपच्या बेताल माकडचेष्टा पाहून बाळासाहेब काय म्हणाले असते? 'रोखठोक'मधून संजय राऊत म्हणतात...