Sudhir Mungantiwar : ऊठ मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट, सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा
शिवसेना काँग्रेसच्या विचारांनी पुढे जात असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कांदिवलीत आयोजीत करण्यात आलेल्या पोलखोल सभेत मुनगंटीवार यांनी सेनेवर निशाणा साधला.
![Sudhir Mungantiwar : ऊठ मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट, सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा Bjp Leader Sudhir Mungantiwar criticized on Shivsena Sudhir Mungantiwar : ऊठ मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट, सुधीर मुनगंटीवारांचा नवा नारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/19/5f9a0e2afd273e6b351aa2a3b7a7f245_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Sudhir Mungantiwar : बाळासाहेबांच्या 24 कॅरेटची शिवसेना संपली आहे.आताची शिवसेना काँग्रेसच्या विचारांनी पुढे जात असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मुंबईत भ्रष्टाराचाराशिवाय काही सुरु आह का? असा सवालही त्यांनी केला. त्याचबरोबर 'ऊठ मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट' असा नवा नारा देखील सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे.
मुंबई पालिकेचं बजेट हे कोणाच्या बापाचं नाही. हा पेग्वींनवालोंका पैसा नही है, असेही मुनगंटीवार म्हणाले. असा कोणता विषय नाही ज्यात सरकारनं पैसै खाल्ले नाहीत असा आरोपही त्यांनी यावेळी केला. गाडी सायलेंट मोडवर नाही जात तर वायब्रंट मोडवर चालते. चिऊ ताई चिऊ ताई दार उघड, पण कधी दार उघडलं नाहीच. तसेच फाईलीचंही आहे. पैसै दिल्याशिवाय फाईल वर जातच नाही असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आमची दोस्ती नाही, भविष्यात यांच्याशी दोस्ती होणार नसल्याचा उल्लेखही मुनगंटीवार यांनी केला. गाडी स्पिडवर चालते आणि हे नोटांच्या स्पिडवर चालतात. ही नाले सफाई नाही तर हात सफाई असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.
जितना खाते है उतनी भूक बढती है, असेही मुनगंटीवार यावेळी म्हणाले. यांच्याकडे अशी कोणती बॅंक आहे जी या जन्मात पैसै टाकायचे आणि पुढच्या जन्मात खायचे असा सवालही त्यांनी केला. त्यामुळे मुंबईकर ऊठ उघड तुझी मुठ आणि थांबव शिवसेनेची लूट असा नवा नारा मुनगंटीवार यांनी दिला आहे. मुंबईत भ्रष्टाराचाराशिवाय काही सुरु आहे का? पेग्विंन, रस्ते काय काय चाललंय असेही ते म्हणाले. ऑलिम्पिकमध्ये अनेक स्पर्धा होतात. कोणी गोल्ड, कोणी सिल्वर पदक जिंकते. पण ऑलिम्पिकमध्ये जर भ्रष्टाचाराची स्पर्धा ठेवली तर शिवसेना गोल्ड मिडेल आणल्याशिवाय राहणार नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी सेनेला लगावला. भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्त्वात कांदिवलीत पोलखोल सभेचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी त्यांनी सेनेवर जोरदार निशाणा लगावला.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)