एक्स्प्लोर

एकनाथ खडसे, राजू शेट्टी यांची नावं वगळून मुख्यमंत्री राज्यपालांकडे नवी यादी पाठवणार; सूत्रांची माहिती

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची यादी राज्यपालांनी अद्याप मंजूर केली नसल्याने आता त्यामधून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची नावं वगळण्यात येणार असल्याची माहिती आहे.

मुंबई: राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांसाठी आता नवी यादी पाठवण्यात येणार असून त्यामधून राजकीय पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांची नावं वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आधीच्या यादीतील एकनाथ खडसे, राजू शेट्टी आणि इतर राजकीय नेत्यांची नावं वगळण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री पुढच्या आठवड्यात ही नवी यादी राज्यपालांकडे पाठवणार असल्याची माहिती आहे.

राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांची शिफारस करुन दीड वर्षे झाली तरी त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नवी यादी राज्यपालांना पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामध्ये राजकीय पार्श्वभूमी असणारे एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी तसेच इतर नावं वगळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. राजकीय पार्श्वभूमी असलेली नावं वगळून त्यामध्ये काही नवीन नावं दिली जाणार आहेत. 

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान शरद पवारांनी पतप्रधानांकडे राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न उपस्थित केला होता. 

महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या 12 सदस्यांच्या नावाची यादी कॅबिनेटमध्ये मंजूर करण्यात आली होती आणि नंतर ती राज्यपालांकडे पाठवण्यात आली होती. पण गेल्या दीड वर्षांपासून ही यादी राज्यपालांच्या कार्यालयातच पडली असून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. 

राज्यपाल नियुक्ती आमदारांच्या नव्या यादीत प्रोटोकॉल पाळून वेगवेगळ्या क्षेत्रातून ही नावं पाठवण्यात येणार आहेत. त्यामुळे या नावांना राज्यपालांची कोणतीही हरकत नसेल अशी रणनीती महाविकास आघाडीकडून आखण्याचा प्रयत्न आहे. 

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे नाव बाजूला पडणार आहे. त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आगामी निवडणुकीत संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. तर राजू शेट्टी यांनी आधीच महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून आपलं नाव या यादीतून वगळावं यासाठी त्यांनी राज्यपालांची भेटही घेतली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या: 

महत्त्वाच्या बातम्या

मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Pune Junnar Crime news: मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
मुलीवर अत्याचार करुन गावकऱ्यांसोबत सीसीटीव्ही फुटेज पाहता बसला, चुकून स्वत:चीच ओळख पटवून दिली
Bihar RJD Protest: विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी AK-47 का चालवली? आदेश नेमका कोणी दिला?? विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ बिहारमध्ये राजदचा राजभवनावर मोर्चा, तेजस्वी यादव रस्त्यावर, आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Embed widget