एक्स्प्लोर

भाजपला पळी पंचपात्रापासून ते शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत नेणारा नेता म्हणजे गोपीनाथ मुंडे; स्मृतीदिनी दिग्गज नेत्यांकडून आठवणींना उजाळा

Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्त देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आहेत.

Gopinath Munde : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज दहावा स्मृतिदिन आहे. यानिमित्त देशासह राज्यभरातील लाखो कार्यकर्ते गोपीनाथ मुंडे यांना विनम्र अभिवादन करत आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), यांच्यासह अनेक नेते मंडळींनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्स या सोशल मिडिया माध्यमावर म्हटले आहे की,  महाराष्ट्राच्या मातीतील एक असामान्य राजकीय व्यक्तिमत्व, माजी केंद्रीय मंत्री आणि राज्याचे माजी उप-मुख्यमंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन.

राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व : देवेंद्र फडणवीस 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजकारण आणि समाजकारणातील अभ्यासू नेतृत्व, लोकहिताच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे, आमचे नेते, प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक मा. गोपीनाथजी मुंडे यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...

भाजपला पळी पंचपात्रापासून ते शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत नेणारा नेता गोपीनाथ मुंडे : प्रकाश महाजन 

मनसे नेते प्रकाश महाजन म्हणाले की, पळी पंचपात्रापासून ते शेतकऱ्याच्या रुमण्यापर्यंत भारतीय जनता पक्ष नेणारा एकमेव नेता म्हणजे गोपीनाथराव. मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाणारे राजकीय व्यक्ती म्हणजे गोपीनाथ राव, अशा शब्दात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी स्व.गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली. 

अजित पवारांकडून आदरांजली

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांना पुण्यतिथीनिमित्त भावपूर्ण आदरांजली! राज्यातील सर्वसामान्य जनमानसासाठी आणि कष्टकरी ऊसतोडणी मजुरांसाठी ते आयुष्यभर झटले. त्यांच्या स्मृतींना वंदन करतो.

आजही तुम्ही ऊर्जा रूपाने आमच्यातच : धनंजय मुंडे

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे की,  अप्पा, दहा वर्ष झाली तुम्हाला आमच्यातून जाऊन, पण आजही तुम्ही ऊर्जा रूपाने आमच्यातच आहात. ती ऊर्जा कायम लोकसेवेची प्रेरणा देत राहील... स्व.गोपीनाथराव मुंडे साहेब (अप्पा) यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र आदरांजली...

पंकजा मुंडेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

पंकजा मुंडे यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीओ जारी करून कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. पंकजा मुंडे यांनी म्हटले की, दरवर्षी 3 जून हा दिवस येतो, तेव्हा आपल्या सगळ्यांना हृदयामध्ये कालवल्यासारखे होते. मुंडे साहेबांसारखा नेता, आपलं उर्जास्थान, आपलं शक्तीस्थान, आपलं प्रेरणास्थान, आपलं श्रध्दास्थान आपल्यातून गेले. माझा पिता हरवला. तुमचा नेता हरवला. माझ्या पित्यावर आणि माझ्या नेत्यावर तुम्ही स्वतःच्या पित्यापेक्षाही जास्त प्रेम केले. आज दहा वर्षे झाली. पण तरीही तुम्ही न चुकता 3 जूनला गोपीनाथ गडावर येता.

आणखी वाचा 

Beed Lok Sabha: माझाही पराभव झाला होता, तुम्ही आदळआपट करुन काय साध्य करणार? पंकजा मुंडेंचा बजरंग सोनवणेंना सवाल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Pushpa 2 : तेलगू चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद बाब, पुष्पा 2 सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणारZero Hour Maratha Vs OBC  : मराठा वि. ओबीसी संघर्षाचा फटका कोणाला? भविष्यात चित्र काय करणार?Zero Hour Vidhansabha Election : कसा राहिला महाराष्ट्र विधानसभेचा प्रचार?Nashik BJP-NCP Rada | नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात राडा, शरद पवार-भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
Anil Deshmukh VIDEO : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक, डोक्याला गंभीर जखम, घळाघळा रक्त बाहेर
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
मोठी बातमी! ईडीची कारवाई, 622 कोटींच्या मालमत्तेवर टाच; लॉटरी किंग्जच्या 22 ठिकाणी छापे
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
भाजप नेत्यांनी उडवला प्रचाराचा धुरळा, मोदींच्या 10 सभा तर शाहांच्या 15; कोणी किती सभा घेतल्या?
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
Photos : बारामतीत एकवटलं पवार कुटुंब, युगेंद्रांच्या गालावरुन प्रतिभाआजीने फिरवला हात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Embed widget