एक्स्प्लोर

'जामिनावर सुटलेला आहात, जोरात बोलू नका अन्यथा महागात पडेल', चंद्रकांत पाटलांचा छगन भुजबळांना इशारा

छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की,  छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल.

मुंबई : पाच राज्यांच्या निवडणुकीसह पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालांचे कल हाती येत आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात जोरदार मुसंडी मारली आहे. यावर विषयावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांनाच इशारा दिला आहे. छगन भुजबळांनी बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. याबाबत बोलताना पाटील म्हणाले की,  छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. बोलायचं असेल पंढरपूर, आसाम, पुद्दुचेरीवर बोला, असं ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये ममता जिंकल्या तर ईव्हीएम बरोबर आहे आणि आसाममध्ये भाजप जिंकली तर ईव्हीएम चूक आहे, असं होत नाही. बंगालमधील पराभवाचं दु:ख तर वाटणारच. आम्ही कुठलीही गोष्ट कार्यकर्ते म्हणून करतो. आम्ही निवडणुका फार गांभिर्याने घेतो. पराभव जरी झाला असला तरी भाजप विरोधात सगळे एकत्र आले होते हे लक्षात घ्यायला हवं. वर्षानुवर्षे तिथं सरकारमध्ये असलेले नाही च्या बरोबरीने दिसत आहेत, असं पाटील म्हणाले. 

ते म्हणाले की, काँग्रेस आणि डाव्यांनी तृणमूलच्या पारड्यात आपली मतं टाकली. देशात आता भाजप विरुद्ध सगळे अशी स्थिती आहे. भाजप विजयी झाला की प्रामाणिकपणे कारभार होणार आणि तुमची प्रकरणं बाहेर काढणार ही भीती असते. त्यामुळं काहीही करा पण भाजपला पराभूत करा हाच फंडा पश्चिम बंगालमध्ये चालला, असं पाटील म्हणाले. 

काय म्हणाले छगन भुजबळ 
मंत्री छगन भुजबळ म्हणाले की, ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या.  मै अपना बंगाल नहीं दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही, असं भुजबळ म्हणाले. ते म्हणाले की,  आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही.  भाजप विरोधात प्रचंड लाट देशात तयार झाली आहे. याकाळात देशात निवडणूक झाली तर भाजप नावाला ही सापडणार नाही. पंढरपूर पोट निवडणुकीचा निकाल गट तट आणि इतर स्थानिक राजकारणामुळे लागत आहे, त्यावरून देशाचा कल  बांधता येत नाही, असं भुजबळ म्हणाले. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Nawab Malik : नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतोय का ? अजित पवारांचा सवालABP Majha Headlines :  1PM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सLadki Bahin Yojana Nagpur : नागपूर महापालिकेच्या परिसरात कागदपत्रांसाठी महिलांची धावाधावAjit Pawar Meeting : आगामी विधानसभा महायुतीतील तीन मुख्य पक्ष एकत्रित लढणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
कोल्हापुरात दिवसाढवळ्या मुडदा पाडल्यानंतरची भाषा, 'संपलयं नव्हं... मग, जिंकलं सोडा... विषय संपला'
Parliament Session 2024 Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली,  राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
PM Modi Live : देशात तिसऱ्यांदा सरकार आलं, अनेकांनी नाकं मुरडली, राज्यसभेत मोदींचा हल्लाबोल
Subodh Bhave :  सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
सोशल मीडियावरचा शहाणपण शिकवू नका; मालिकेत AI वापरावर टीका करणाऱ्यांना सुबोध भावेनं सुनावलं
Sidharth Malhotra Fan Fraud : कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा  चुना
कियाराने सिद्धार्थवर काळी जादू केलीय, त्याला...; चाहतीला लागला 50 लाखांचा चुना
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांच्या किंकाळ्या; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
मृतदेहांचे ढिग, नातेवाईकांचा आक्रोश; हाथरसमधील विदारक दृश्य पाहून पोलिसाचा हृदयविकारानं मृत्यू
Kolhapur News : गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न? घरात खड्डा काढला, कराडच्या मांत्रिकासह सहा जणांवर गुन्हा
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
तुम्हाला लाडकी बहिण योजनेचा लाभ घ्यायचाय? नेमकं काय करावं लागेल? कोणती कागदपत्रे आवश्यक? सविस्तर माहिती एका क्लिकवर
Aditya Sarpotdar Kakuda Movie Trailer : रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
रितेश देशमुख करणार भूताची शिकार! 'मुंज्या'नंतर आदित्यच्या नव्या हॉररपटाचा ट्रेलर आउट
Embed widget