...तर तुमच्या लेकीबाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येईल; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
BJP Leader Anil Bonde on Hijab : इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब घालणे बंधनकरक आहे तशीच परिस्थिती पुढच्या तीस वर्षात आपल्या मुलींवर आली तर नवल वाटून घेऊ नका असं भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे म्हणाले.
BJP Leader Anil Bonde on Hijab : हातावर हात देऊन बसले राहाल तर तुमच्या लेकीबाळींवर देखील हिजाब घालण्याची वेळ येईल असे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे नेते डॉ.अनिल बोंडे यांनी केले आहे. वरुड-मोर्शी तालुक्यातील गावांमध्ये विविध ठिकाणी भेटी देत असतांना डॉ. बोंडे यांनी हे वक्तव्य केलं. यावेळी वर्ध्याचे भाजप खासदार रामदास तडस हे देखील उपस्थित होते. आपण धार्मिक आहोत आणि भारत माता की जय म्हणतो असा विचार करून शांत बसलात तर इतर देशांमध्ये ज्याप्रमाणे हिजाब घालणे बंधनकरक आहे तशीच परिस्थिती पुढच्या तीस वर्षात आपल्या मुलींवर आली तर नवल वाटून घेऊ नका असंही डॉ. बोंडे यावेळी बोलताना म्हणाले.
अमरावती शहरात 13 नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेमध्ये आम्ही होतो आणि आमच्या तरुणांनी समर्थपणे ताकद दाखवली. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य केलं त्या ठिकाणची मंदिरं सुरक्षित राहिली इतर ठिकाणी मात्र मंदिराच्या बाजूला मस्जिद उभी झाली. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताना आपली मुलं मजबूत राहिली पाहिजे हे देखील आपण लक्षात ठेवलं पाहिजे असे आवाहन डॉ. बोंडे यांनी यावेळी बोलताना केलं.
अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करतो- लाड
यावर बोलताना भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले की, अनिल बोंडे यांच्या वक्तव्याचे आम्ही समर्थन करतो. त्यांचं वक्तव्य वादग्रस्त नाही तर विचार करायला लावणारं आहे. सरकार शिवजयंती वर निर्बंध लादत आहे. मिरवणुका काढण्यावर निर्बंध लादले जात असतील तर आमच्या भगिनीवर हिजाब घालण्याची वेळ येईल, असं लाड म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामीसह हे दिग्गज नेते शर्यतीत
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
- Shivjayanti 2022 : अमित ठाकरेंच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर अभिषेक आणि पूजन, राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha