(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uttarakhand CM : कोण होणार उत्तराखंडचे मुख्यमंत्री? राजनाथ सिंह करणार नावाची घोषणा, धामींसह 'हे' दिग्गज नेते शर्यतीत
Uttarakhand CM : उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक, त्रिवेंद्र सिंह रावत आणि भाजप आमदार सतपाल यांच्यात बैठक पार पडली.
Uttarakhand CM : उत्तराखंड विधानसभा (Uttarakhand Assembly Election 2022) निवडणुकीत भाजपने बहुमत मिळवल्यानंतर सरकार स्थापनेसाठी कसरत सुरू आहे. उत्तराखंडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विधिमंडळ पक्षाच्या नेत्याबाबत सुरू असलेला सस्पेंस आज संध्याकाळी संपणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडच्या राजकारणात काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह अनेक दिग्गज नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत.
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत होणार मुख्यमंत्रिपदाची निर्णय
उत्तराखंडच्या सर्व खासदारांना डेहराडूनमध्ये होणाऱ्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. विधीमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर केले जाईल.
रविवारी पार पडली बैठक
रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवास्स्थानी उत्तराखंडमधील सरकार स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संघटनेचे सरचिटणीस बीएल संतोषही उपस्थित होते.
सुमारे एक तास चाललेल्या या बैठकीमध्ये उत्तराखंडचे काळजीवाहू मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, माजी मुख्यमंत्री रमेश पोखरियाल निशंक, त्रिवेंद्र सिंह रावत आणि भाजप आमदार सतपाल हेही उपस्थित होते.
या बैठकीत उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यांबाबतही चर्चा झाली. बैठकीपूर्वी धामी म्हणाले की, सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावावर भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Viral Video : रात्री 12 वाजता नोएडाच्या रस्त्यावर धावत होता मुलगा, नेटकरी करतायत सलाम, कारण ऐकून व्हाल थक्क
- Shivjayanti 2022 : अमित ठाकरेंच्या हस्ते शिवनेरी किल्ल्यावर अभिषेक आणि पूजन, राज्यभरात शिवजयंतीचा उत्साह
- RRR : राम चरण आणि ज्युनियर एनटीआरने आमिर खानला शिकवला डान्स, 'नाटू नाटू' गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha