एक्स्प्लोर
VIDEO : तो आहे देवेंद्र आमचा... भाजपचं कॅम्पेन साँग लाँच
मुंबई : मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढत असल्यामुळे या दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, मनसे, शिवसेना आणि भाजप हे सर्वच महत्त्वाचे पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत. त्यातच भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं गुणगान करणारं गाणं लाँच केलं आहे.
'विकास करेल जो सर्वाँचा, तो आहे देवेंद्र आमचा' असे शब्द असलेल्या गाण्याचा व्हिडिओ महाराष्ट्र भाजपकडून लाँच करण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस मुंबईचा विकास घडवण्यासाठी कटिबद्ध आहेत, असं गाण्याच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये फडणवीसांने केलेल्या विविध उपक्रमांच्या फोटो आणि व्हिडिओंचा मोन्टाज करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे हे गाणं मराठीसोबतच हिंदी भाषेतही लाँच करण्यात आलं आहे. अमराठी भाषिक मतदारांना डोळ्यासमोर ठेवून 'है तरक्की जिसका सपना, वो तो है देवेंद्र अपना' असं हिंदी गाण्याचे शब्द आहेत.
विकास करेल जो सर्वाँचा, तो आहे देवेंद्र आमचा
जो सर्वांचा श्वास हो
त्या सर्वांची साथ हो
अव्वल मुंबई अव्वल महाराष्ट्र
प्रगतीचा हो एकच ध्यास
विकास करेल जो सर्वाँचा
तो आहे देवेंद्र आमचा
घेऊन साऱ्यांस तो चालतो
मेहनत जो दिनरात करतो
प्रगतीसाठी हो लढतो
महिलांना आधार देतो
सर्वांचे रक्षण करतो
रोजगाराने स्फूर्ती जागवे
तरुणांचा सन्मान वाढवे
भेदभाव कधी करेना
जो सर्वधर्मसमभाव हो
हाती हात घेऊन चालतो
तो जे संकल्प करतो
ते सारे हो पुरे करतो
विकास करेल जो सर्वाँचा
तो आहे देवेंद्र आमचा
मुंबईची भरारी हो
जिंकण्याची तयारी हो
पुन्हा एकसाथ येऊया
परिवर्तन हो घडवुया
अव्वल जो मुंबई घडवेल
चला त्यालाच जिंकवुया
सुंदर स्वच्छ बनवुया
इथे सुशासन आणुया
चला सुशासन आणुया
त्याला साथ देऊया
विकास करेल जो सर्वाँचा
तो आहे देवेंद्र आमचा
पाहा व्हिडिओ :
https://twitter.com/BJP4Maharashtra/status/832146532447162368
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement