नवाब मलिक यांचा हायड्रोजन बॉम्ब फुसका निघाला, गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया
Girish Mahajan vs Nawab Malik : आरोप करताना मालिकांनी ठोस पुरावे द्यायला हवेत, नवाब मलिकांना महाजनांचं आव्हान
Girish Mahajan : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा हायड्रोजन बॉम्ब हा फुसका बार असल्याचे वक्तव्य भाजप नेते गिरीश महाजन (BJP Girish Mahajan) यांनी जळगाव येथे केले आहे. नवाब मलिक यांची गुंडी अडकली असल्याने ते असे आरोप करीत आहेत मात्र राजकीय विरोध म्हणून त्यांनी आरोप करण्यापेक्षा सबळ पुरावे द्यायला हवेत, असेही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. गेल्या काही दिवसांपासून गिरिश महाजन राज्यात खळबळ माजवणारे आरोप करत आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांसह एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांचा धडका लावला आहे. मलिकांच्या आरोपांनी राज्यात खळबळ माजवली आहे. मलिकांच्या आरोपाला भाजप नेत्याकडून प्रत्युत्तर दिली जात आहेत.
चोपडा तालुक्यातील सेनेचे माजी आमदार कैलास पाटील यांनी नुकताच राष्ट्रवादी लक्षात प्रवेश केला होता. त्यांच्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये चलबिचल निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. यातूनच सबळ नेतृत्व अभावी चोपडा तालुक्यातील दोनशे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आज गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना गिरीश महाजन यांनी आघाडी सरकार सर्वच क्षेत्रात अपयशी ठरल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारचे सर्व नेते जनतेचे प्रश्न सोडविण्याऐवजी बिनबुडाचे आरोप करीत लक्ष विचलित करण्याचा प्रयत्नं करत आहेत, असं वक्तव्य गिरिश महाजन यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेवर निशाणा साधताना महाजन म्हणाले की, शिवसेनेमध्ये जनतेचे प्रश्न सुटत नसल्याने त्यांचे कार्यकर्ते राज्यात आमची सत्ता नसताना ही भाजपामध्ये आले आहेत. चोपडा तालुक्यात भाजपाचा आमदार नसला तरी चोपडा तालुका हा भाजपचा नेहमीच बालेकिल्ला राहिला असल्याचंही गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
संबधित बातम्या :
क्लिनअप अभियान राबवतोय, ईडी घरी आली तर स्वागत करेल : मंत्री नवाब मलिक
खोट्या नोटांच्या रॅकेटला तत्कालीन फडणवीस सरकारचा पाठिंबा, केसेस कमकुवत करण्यात वानखेडेंची मदत : नवाब मलिक
Nawab Malik : छापे वक्फ बोर्डावर नाहीत, एका ट्रस्टवर : नवाब मलिक