(Source: ECI/ABP News/ABP Majha)
क्लिनअप अभियान राबवतोय, ईडी घरी आली तर स्वागत करेल : मंत्री नवाब मलिक
ईडीच्या (ED) छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : पुण्यातील वक्फ बोर्डाच्या कार्यलयावर छापे पडलेले नाही. ईडीचे छापे पुण्यातील एका ट्रस्टवर पडल्याची माहिती मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे. ईडीच्या छापेमारीबाबत मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले आहे.
मंत्री नवाब मलिक म्हणाले, काही माध्यमांनी नवाब मलिक यांच्या अखत्यारीत येणाऱ्या वक्फ बोर्डामागे ईडीचा ससेमिरा लागल्याच्या बातम्या केल्या. या बातम्या खोट्या आहेत. ईडी माझ्या घरी आली तर त्यांचं मी स्वागत करेल. आमच्या क्लीनअप अभियानात ईडी सहभागी होत असेल तर आम्ही त्याचे स्वागत आहे.
वक्फ बोर्डाचे काम पारदर्शक पद्धतीने सुरू
वक्फ बोर्डाविषयी माहिती देताना नवाब मलिक म्हणाले, पहिल्यांदाच्या इतिहासात वक्फ बोर्डावर एका पूर्णवेळ अधिकाऱ्यांची आम्ही नियुक्ती केली आहे. बोर्डाने आलेल्या सर्व तक्रारींची दखल घेतली आहे. तसेच अनेकांना अटक देखील करण्यात आली आहे. जेव्हापासून हे खाते माझ्याकडे आले तेव्हापासून क्लिनअप अभियान सुरू झाले आहे. वक्फ बोर्डाचे काम संपूर्ण पारदर्शक पद्धतीने सुरू आहे. आगामी काळात वक्फ कार्यालयाची सर्व काम डिजीटली करण्यात येणार आहे. जुने कागदपत्र, सर्व फाईल्स स्कॅन करून सुरक्षित करण्याचे काम आम्ही केले.
मलिक यांच्या मागे ईडीचा ससेमिरा ? ; वक्फ बोर्डातील घोटाळ्याप्रकरणी सात ठिकाणी छापा
ड्रग्ज प्रकरणी मलिक आक्रमक!
गुजरातमध्ये दुसऱ्यांदा ड्रग्जचा साठा पकडल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा गंभीर आरोप केले आहेत. ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे. मलिक यांनी म्हटलं की, मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा वारंवार केला जातो. आता एक घटनाक्रम समोर आला आहे की गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटी रुपये किमतीचं ड्रग्ज सापडले आहेत. समुद्रामार्गे गुजरातमध्ये येत सर्व देशभरात ड्रग्ज जातंय का? याची चौकशी करावी, अशीही मागणी मलिक यांनी केली. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेल मध्ये राहत होते. त्यांचे किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा ड्रग्ज सापडल्यामुळे पुन्हा आता यांच्याबाबत संशय निर्माण झाला आहे, असं मलिक म्हणाले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha