एक्स्प्लोर

शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकलं, सरकारकडून मात्र फसवणूक

जळगाव : पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारतचा नारा द्यायला सुरुवात केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत विविध योजनाही सुरु केल्यात. मात्र प्रत्यक्षात त्या योजनेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे भुसावळमधील एका घटनेनं उघड झालं आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालय बांधण्यासाठी एका महिलेला चक्क आपलं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे.   भुसावळच्या साकेगावमध्ये राहणाऱ्या सुशीला कोळींची अवस्था लंकेच्या पार्वतीसारखी झाली आहे. पती हयात असतानाही सुशीला कोळींना मोकळ्या गळ्यानं वावरावं लागत आहे. सरकारनं केलेल्या फसवणुकीमुळे त्यांना स्वतःचं मंगळसूत्र गमवावं लागलं आहे. स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शौचालय बांधण्याची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल, असं कोळी यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं. सरपंचानं सांगितलं की शौचालय बांधा, सरकारी योजनेतून पैसे मिळवून देतो. त्यामुळे आम्ही शौचालय बांधल्याचं त्या सांगतात.   खुद्द गावच्या सरपंचांनीच गळ घातल्यामुळं कोळी कुटुंबानं पदरचे पैसे खर्च करुन शौचालय बांधायचं ठरवलं. खरं तर बेताच्या आर्थिक परिस्थितीमुळे शौचालयाचा खर्च परवडणारा नव्हता. त्यासाठी सुशीला यांनी मंगळसूत्र गहाण ठेवून सावकारासमोर पदर पसरला. शौचालय बांधून पूर्ण झालं... सरकारी अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी देखील केली. मात्र कोळी यांना शौचालय योजनेचे पैसे मिळाले नाहीत. गेल्या 7 महिन्यांपासून ते ग्रामपंचायत आणि इतर सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत.   एबीपी माझानं यासंदर्भात ग्राम विकास अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, 2 महिन्यांत सुशिला कोळी यांना योजनेचे पैसे मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. स्वच्छ भारत मिशनसाठी मोदींचं सरकार तुमच्या आमच्याकडून कर वसूल करतं. मात्र असं असतानाही, सुशीला कोळी सारख्या गरजूंना शौचालयासाठी मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं, याहून मोठी शोकांतिका ती कोणती?  

संबंधित बातम्या :

 

मंगळसूत्र गहाण ठेवून मुलीचं शिक्षण, जाधव कुटुंबीयांना अनेकांचे मदतीचे हात

वडिलांच्या तेराव्याचा खर्च टाळून त्यांनी महिलांसाठी बांधले सार्वजनिक शौचालय

शौचालयासाठी सौभाग्याचं लेणं विकणाऱ्या 'ती'चा मंगळसूत्र देऊन सत्कार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhau Kadam : अभिनेते भाऊ कदम राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे स्टार प्रचारकABP Majha Headlines :  3 PM : 05 November 2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 05 November 2024Uddhav Thackeray Radhanagri Speech : शिवरायांचं मंदिर ते मुलांना मोफत शिक्षण; ठाकरेंची मोठी आश्वासनं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
मिलिंद देवरांचा अर्ज भरताना शोभायात्रेतील सहभागी लोकांना 500 रुपये देऊन आणल्याचा आरोप, ठाकरेंच्या शिवसेनेची निवडणूक आयोगाकडे तक्रार 
मनसेनंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या निशाण्यावर मिलिंद देवरा, निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार, काय घडलं?
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
''कोणत्या वस्तीवर कोणतं कुत्र भुंकतं अन् कोणतं गप्प बसतं हे सुद्धा सांगू शकतो''; शहाजी बापूंविरुद्ध ठोकला शड्डू
Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
पुण्यात आरपीआय आठवले गटाला खिंडार! राजीनामा दिलेल्या माजी उपमहापौरांची महायुतीविरोधी भूमिका, मतदान न करण्याची दिली शपथ
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
विधानसभेतही 'सांगली पॅटर्न',  अपक्ष उमेदवार जयश्री पाटलांना निवडून देण्याचं विशाल पाटलांचं आवाहन
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Solapur Assembly Election : सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 11 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
Embed widget